कंगनाच्या बंगल्यावर आकसाने कारवाई नाही; मुंबई महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण

सुनीता महामुणकर
Thursday, 10 September 2020

अभिनेत्री कंगना राणौतच्या पाली हिल येथील बंगल्यामध्ये केलेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या पाडकामाचे ठाम समर्थन आज मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केले. बांधकाम नियमबाह्य आहे म्हणून कारवाई केली.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या पाली हिल येथील बंगल्यामध्ये केलेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या पाडकामाचे ठाम समर्थन आज मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केले. बांधकाम नियमबाह्य आहे म्हणून कारवाई केली. अन्य हेतूने नाही, असा खुलासा महापालिकेने केला. दरम्यान, न्यायालयाने कारवाईला केलेली मनाई पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली आहे.

येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या इंजिनिअर तरुणींची सुटका; भाजप कार्यकर्त्यांची कामगिरी

कार्यालयात  नियमबाह्य बांधकाम केले असल्याचा दावा महापालिकेने केला. याबाबत एक प्रतिज्ञापत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.  कंगनाच्या बंगल्यात काम सुरु असूनही ती याबाबत कांगावा करीत आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला संरक्षण देऊ नये, असे  महापालिकेचे विशेष वकील एस्पी चिनाय यांनी खंडपीठापुढे सांगितले.  पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाने अॅड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईला बुधवारी अंतरिम स्थगिती दिली आहे. 

मराठा समाजाला शिक्षण, रोजगारासाठी सवलती द्या! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

न्यायालयाने महापालिकेला पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली आहे. तसेच, महापालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर खुलासा करण्याचे निर्देश कंगनाला दिले. पुढील सुनावणी 22 सप्टेंबररोजी होणार आहे. तर, पालिका 18 सप्टेंबरपर्यंत पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करु शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

कंगनाचे आरोप आधारहिन!
कंगना आधारहिन आणि अकारण छळवणुकीचे आरोप करीत आहे. पालिकेने कोणत्याही आकसाने ही कारवाई केलेली नाही. कार्यालयात केलेला बदल नियमबाह्य आहे आणि तिथे काम सुरू होते, असे पालिकेतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC explain action on Kanganaranaut bungalow in court