BMC: कलानगरच्या पुरनियंत्रणाचा खर्च वाढला; प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर

bmc
bmcsakal media

मुंबई : कलानगरच्या (kalanagar) परिसरातील पुरनियंत्रणांसाठी (flood control) पूर नियंत्रक दरवाज्याच्या चेंबरच्या बांधकामाचा खर्च (maintenance expenses) तब्बल 26 टक्क्यांनी वाढला आहे.महत्वाचे म्हणजे काम पुर्ण झाल्यानंतर तब्बल वर्षभराने महानगरपालिका (bmc) प्रशासनाने या वाढीव खर्चाला मंजूरी मागण्याचा प्रस्ताव (proposal) स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

bmc
इंडिया स्कील काँपिटिशन ; राज्यस्तरीय फेऱ्या 'या' दिवसापासून

वांद्रे पुर्व येथील कलानगर आणि इंदिरानगर परीसरात पावसाळ्यात ओढावणारी पुरपरीस्थी रोखण्यासाठी महानगर पालिकेने वांद्रे कुर्ला संकुलात वाकोला नदीवर चार ठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.त्याचा चांगला फायदाही या पावसात झाला आहे. एप्रिल 2020 मध्ये हे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी पुरनियंत्रण दरवाजे या ठिकाणी बसविण्यात आले होते.

या दरवाज्याचे चेंबर बनविण्यासाठी महानगर पालिकेने 1 कोटी 4 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते.हे काम पुर्ण होऊन ते पंपिंग स्टेशनही सुरु झाले आहे.चेंबर उभारण्याचे काम मे 2020 मध्ये पुर्ण झाले.मात्र,या कामाचा खर्च 27 लाखांनी वाढला असून खर्च 1 कोटी 31 लखांवर पोहचला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.या वाढीव खर्चाला मंजूरी देण्याचा प्रस्ताव या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.सर्व करांनुसार मुळ खर्च 1 कोटी 31 लाख रुपयांचा होता.तो आता सर्व करांसह 1 कोटी 64 लाखांवर पोहचला आहे.

म्हणून खर्च वाढला

चेंबर बनविण्याचे काम खाडी जवळ असल्याने प्रत्यक्ष कामाच्या वेळी जमिनीमध्ये दलदलीचा अडसरा निर्माण झाला.त्यामुळे स्टील,कॉंक्रिकट तसेच इतर साहित्यात वाढ झाल्याने हा खर्च वाढला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.मात्र,हे काम तातडीचे असल्याने ते पुर्ण करुन घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com