धक्कादायक प्रकार! जंम्बो ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं कंत्राट दिलं बिल्डरला; मुंबई महानगर पालिकेचा प्रताप..

समीर सुर्वे
Monday, 13 July 2020

मुंबई महानगर पालिकेने कोविड केंद्राातील साहित्य पुरविण्याचे  कंत्राट बिल्डरला दिल्यावरुन वाद सुरु असतानाच आता त्याच बिल्डरला जंम्बो ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्याचे कंत्राट दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेने कोविड केंद्राातील साहित्य पुरविण्याचे  कंत्राट बिल्डरला दिल्यावरुन वाद सुरु असतानाच आता त्याच बिल्डरला जंम्बो ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्याचे कंत्राट दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. आश्चर्य म्हणजे निवीदा न मागवता हे कंत्राट देण्यात आले आहे.

गोरेगाव येथील कोविड केंद्रााााातील साहित्य पुरविण्याचे  10 कोटी 90 लाख रुपयांचे कंत्राट रोमेल रिलेटर या बिल्डरला देण्यात आले आहे. त्यावरुन वाद सुरु असताना महापालिकेने ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्याचेही कंत्राट या बिल्डरला दिले. 70 ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले. 

हेही वाचा: प्लाझ्मा थेरपी संदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन..  

महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाामार्फत हे काम देण्यात आले असून त्यासाठी निवीदाही मागवण्यात आलेल्या नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. मात्र, यातील विलंबनामुळे 55 सिलेंडर पुरवण्याची सुचना या बिल्डरला महापालिकेकडून करण्यात आली तसेच या विलंबा बद्दल 9 लाख 90 हजाराचा दंडही थोटावण्यात आला आहे.

ड्युरा सिलेंटरची तत्काळ गरज होती. यासाठी एका पुरवठादाराला संपर्क केला मात्र त्यांनी जास्त दर सांगितले.तर दुसर्या पुरवठा दाराने तीन दिवसात 30 पेक्षा जास्त सिलेंडर पुरवणे शक्य नसल्याचे सांगितले. तर, रोमेल रेलिटरने सिलेंडर पुरविण्याची तयारी दाखवली म्हणून त्यांना हे काम देण्यात आले. तसेच विलंबाने सिलेंडर पुरवले म्हणून दंडही करण्यात आला असे पालिकेकडून सांगण्यात आले.

महामारीच्या काळातही अत्यंत वेगाने 55 सिलेंडर पुरवले.यातील 10 सिलेंडर ज्या दिवशी ऑर्डर मिळाली त्या दिवशी पुरवले. इतर कंत्राटदारांच्या तुलनेने कमी खर्चात हे सिलेंडर पुरविण्यात आले आहे. जून महिन्यात त्यांचा पुरवठा झाला असला तरी त्याचे पैसे अद्याप मिळाले नाही. मात्र,15 सिलेंंडर पुरवले नसल्याचा दावा करत पालिकेने दंडासाठी कारणे दाखवा नोटीस पााााााठवली ही नोटीस चुकीची अाहे. आम्ही ऑक्सिजन सिलेंडर तयार करत नाही.मात्र,अत्यावश्यक परीस्थीती बघून सिलेडर पुरविण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा रोमेल रिलेटरने केला. 

हेही वाचा: मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सची भर पावसात कौतुकास्पद कामगिरी; मेगाब्लाॅक दरम्यान केली दुरुस्तीची कामे..  

भाजपने यावर आक्रमक भुमिका घेतली आहे.निवीदा न काढता बिल्डरला सिलेंडर पुरविण्याचे कंत्राट कशा प्रकारे महापालिका देऊ शकते असा प्रश्न भाजपचे आमदर अमित साटम यांनी उपस्थीत केला. मार्च महिन्या पासून महापालिकेने कोविडसाठी केलेल्या प्रत्येक खरेदीची चौकशी करण्याची गरज असल्याचीही साटम यांनी नमुद केले.

संपादन : अथर्व महांकाळ 

bmc gave contract of oxygen cylinders to builder 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc gave contract of oxygen cylinders to builder