मध्य रेल्वेच्या कोरोना वॉरियर्सची भर पावसात कौतुकास्पद कामगिरी; मेगाब्लाॅक दरम्यान केली दुरुस्तीची कामे..  

प्रशांत कांबळे 
सोमवार, 13 जुलै 2020

आधीच कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात चिंताग्रस्त वातावरण असतांना, दुसरीकडे रेल्वेचे कोरोना वारियर्स मात्र, भर पावसातही आपली कामगिरी बजावतांना दिसून येत आहे.

मुंबई: आधीच कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात चिंताग्रस्त वातावरण असतांना, दुसरीकडे रेल्वेचे कोरोना वारियर्स मात्र, भर पावसातही आपली कामगिरी बजावतांना दिसून येत आहे.

रविवारी रोजी विद्याविहार ते ठाणे दरम्यान असलेल्या मेगाब्लाॅक दरम्यान पावसाने आपली हजेरी लावली तरी, रेल्वेचे कर्मचारी मात्र, आपली कामगीरी चोख बजावतांना दिसून आले आहे. 

हेही वाचा: 'त्या' स्टँडअप कॉमेडियन महिलेला धमकी देणाऱ्याला अखेर अटक; सायबर पोलिसांची कारवाई.. 

मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार-ठाणे अप व डाउन जलद मार्गावर रविवारी देखभाल दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. दरम्यान भांडुप ते मुलुंड दरम्यान 1.54 किमी रूळांचे नूतनीकरण,  रोड रेल वाहनांद्वारे सुमारे 100 स्लीपर रिप्लेसमेंट आणि 55 स्क्रॅप रेल काढून टाकले, पॉइंट्स आणि क्रॉस ओव्हर पॉईंट्स रिप्लेसमेंट व 6 ठिकाणी एल्युमिनो-थर्मिक वेल्डिंगचे कामे पुर्ण करण्यात आले आहे. 

दोन टॉवर वॅगन्स आणि एका शिडी गॅगसह 250 मीटर लांबीचे कॉन्टॅक्ट वायर रिप्लेसमेंट केले, 3 स्प्लाइस आणि 4 कमकुवत पॉईंट काढले.  अंदाजे एक किमी ओएचई वार्षिक ओव्हरहॉलिंग, टर्न आऊट, 40 बाँडची तरतूद आणि बदलले; 39 प्लेट्सची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. 

हेही वाचा: गौरी गणपतीसाठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करा; वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने केली मागणी..

वाशिंद येथील जुना पादचारी पूल पाडला:
 
वाशिंद येथील 100 वर्षाहून अधिक जुना पादचारी पूल निर्धारित वेळेत रोड क्रेनचा वापर करून पाडण्यात आला.  यात प्रत्येकी 18.9 मीटर आणि 2.59 मीटर रुंदीचे दोन स्पॅन होते. या पुलाच्या ऐवजी एक नवीन पादचारी पूल (एफओबी) आधीपासून वापरात सुरू करण्यात आला.

संपादन : अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central railway employee did work even in rain