नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?; BMC कडून १५ दिवसांची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण राणे

नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?; BMC कडून १५ दिवसांची मुदत

राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. यादरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच महापालिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर हातोडा टाकण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आला आहे.

तसेच राणे यांना बांधकाम नियमिततेची योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी राणेंना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर महानगरपालिका कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणेंनी सीआरझेड २ मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही, तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अंतर्गत वाढीव बांधकामाचा उल्लेख नसल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.

हेही वाचा: "९० टक्के बांधकामं बेकायदेशीर आहेत, अगदी…'; नारायण राणेंचा आरोप

यासोबतच अग्निशन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेटसह वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी योग्य कागदपत्रे पुरावे जोडलेले नाहीत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान नारायण राणे यांनी १५ दिवसानंतर योग्य कागदपत्रे सादर कली नाहीत तर मात्र महापालिका कारवाई करणार असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे घरावर कारवाई होण्याची शक्याता आहे.

या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: भारताच्या लष्करप्रमुख पदी ले.जनरल मनोज पांडेंची नियुक्ती

Web Title: Bmc Given Narayan Rane 15 Days To Submit Proper Documents Before Action On Bungalow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNarayan RaneBMC