
राणा दिल्लीत पोहोचण्याआधीच पालिकेचे अधिकारी खारच्या घरी दाखल
राजद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी आता दिल्लीचा रस्ता धरला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याने उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करणार असल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय. (Navneet Rana Leaves to Delhi)
दरम्यान, राणा केंद्र सरकारच्या काही नेत्यांची भेट घेणार आहेत, मात्र तोपर्यंत राणा यांच्या मुंबईतील खारच्या घरी पालिकेचं पथक दाखल झालं आहे. याआधी दोन वेळा हे पथक राणांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र, त्या ठिकाणी कोणीही नसल्याने फक्त नोटीस देण्यात आली. राणांनी केलेलं बांधकाम अनधिकृत असल्याचा संशय पालिकेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना पाहाणी करायची आहे.
राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. (Navneet Rana News) केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही रवी राणांनी म्हटलं आहे. राणांच्या दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण ते दिल्लीला जाण्याआधी बृहन्मुंबई मनपाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी रवी राणा यांच्या घराच्या बांधकामाची एक तास पाहणी केली आहे. आम्ही घराची पाहणी केली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या आधीही दोन नोटीस दिल्या आहेत. आज ही आम्ही पुन्हा नोटीस दिली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Web Title: Bmc Gives Notice To Illegal House Of Navneet Rana In Khar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..