esakal | सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच मास्क घालणे तसेच सामाजिक अंतर राखण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता नोंदणी कार्यालयातून आशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत

सोसायटीत चक्कर मारताना कशाला हवा मास्क ? आधी ही बातमी वाचा, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका...

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंंबई : मास्क न घालता सोसायटीत फिराल तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. मास्क न घालता सोसायटीच्या आवारात फिरणाऱ्या रहिवाशांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकारी सोसायटी कमिटीला देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच मास्क घालणे तसेच सामाजिक अंतर राखण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता नोंदणी कार्यालयातून आशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. पालिकेने यासंबंधी दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे नोंदणी कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोठी बातमी - एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ?  

त्यासाठी व्यवस्थापन समितीने सर्वसाधारण किंवा विशेष बैठक घेऊन मंजुरी घेणे महत्वाचे आहे. मात्र कोरोना महामारीमुळे बैठक घेणे शक्य नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  बैठक घेणे शक्य असलं तरी अशा बैठका घेण्याबाबत कायद्यात सध्यातरी कोणतीही तरतूद नाही. जे सदस्य नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्याविरोधात सारखी तक्रार करणे देखील व्यवस्थापन समितीला शक्य नाही. त्यामुळे सध्या याबाबतचे थेट आदेश काढण्यात आले नसून व्यवस्थापन समितीला केवळ निर्देश देण्यात आल्याचे एस विभागाचे सहाय्यक नोंदणी अधिकारी राजेश लोवेकर यांनी सांगितले.

मोठी बातमी -  कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...

सोसायटी व्यवस्थापन समितीला याबाबतचे अधिकार देण्यात आले असले तरी यामध्ये मोठा गोंधळ असल्याचे ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशनचे पदाधिकारी जेबी पटेल, विजय पटेल यांनी सांगितले. दंड वसूल करतांना पावती द्यायची का? पावती काय नावाने घ्यायची, दंड आकारकेली रक्कम सोसायटीने ठेवायची की पालिकेकडे जमा करायची, काही वाद झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची याबाबतचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

BMC gives permission to housing societies for fine collection for not wearing mask

loading image