एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ?   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ?  

एखाद्या परिसरातील हवेची गुणवत्ता जर 2.5 (धुळीकण) 'पीएम'च्यावर गेली तर हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचं उल्लंघन समजलं जातं.

एक धक्कादायक अहवाल ! मुंबईकरांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होणार ? पुणेकरांनो तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहितीये ?  

मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदुषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य तिन वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे. शिकागोमधील ऍलर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स उपकरणाने दर्शविलेल्या डेटामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एखाद्या परिसरातील हवेची गुणवत्ता जर 2.5 (धुळीकण) 'पीएम'च्यावर गेली तर हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचं उल्लंघन समजलं जातं. यानुसार पुण्यातील लोकांचे आयुष्य 3 वर्ष 4 महिने, कोल्हापूर 2 वर्ष 15 दिवस, नागपूर 3 वर्ष 6 महिने आणि नाशिक मधिल लोकांचे आयुष्य 3 वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे.

मोठी बातमी "ऍप डाउनलोड करा आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासा", असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान...

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या मानांंकनानुसार 10 मायक्रोग्रँम प्रति  क्युबिक मिटर गुणवत्तेची हवा ही शुद्ध हवा मानली जाते. भारतातील हेवेची गुणवत्ता मात्र 40 मायक्रोग्रँम पर क्युबिक मिटरवर आहे, अश्या हवेत 2.5 'पीएम'चे प्रमाण हे अधिक असून अशा हवेचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गेल्या दोन दशकात भारतातील प्रदुषणाच्या पातळीत 42 ट्क्क्यांनी वाढ झाली आहे.  कोविड 19 महामारीच्या काळात याचा धोका हा अधिक वाढला आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करून संशोधकांनी हा अहवाल बनवला आहे.

देशातील अनेक शहरांतील प्रदुषणाची पातळी वाढली असून अधिकतर म्हणजे 84 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही प्रदुषित शहरांत राहत असल्याचे ही अभ्यासात समोर आले आहे. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी त्यातील 2.5 पीएम चे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश पाळणे महत्वाचे आहे. त्यासह मुंबईच्या हवेतील 2.5 पीएम चा स्तर कमी करणे महत्वाचे आहे. 2018 मध्ये मुंबईतील हवेत 2.5 पीएम चे प्रमाण हे 45.7 टक्के इतके होते.

मोठी बातमी - कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत 2019 ला हवेतील 2.5 पीएम चे प्रमाण 20 ते 30 टक्कयांनी कमी करण्याचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेऊऩ कार्यक्रम हाती घेण्यात आला. तसेच 102 शहरांतील हवेची गुणवत्ता ही 2024 पर्यंत 10 पीएम च्या खाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हवेच्या गुणवत्तेत जर का 25 टक्के सुधार झाला तर देशातील लोकांचे आयुष्यमान हे साधारणता  दीड तर दिल्लीकरांचे आयुष्यमान हे 3 वर्षांनी वाढणार आहे.

धोक्याची पातळी ही आपण यापुर्वीच ओलांडली आहे. प्रकल्पांच्या नावाखाली जी पर्यावरणाची हानी होतेय ती न भरून निघणारी आहे. यामुळे प्रदुषणाची पातळी वाढतेय. यातून आपण धडा घेणे महत्वाचे असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प आपण तात्काळ थांबवायला हवेत. यासाठी लोक चळवळ ऊभी राहायला हवी. असं  पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक डॉक्टर गिरीश राऊत म्हणालेत.

( संकलन - सुमित बागुल )

Chicago allergy policy institute air quality life index report about mumbai pune nagpur nashik  

Web Title: Chicago Allergy Policy Institute Air Quality Life Index Report About Mumbai Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top