मुंबई तुंबल्याचे खापर फोडले पर्जन्य वाहीन्यांवर; BMC ने काढला नवा निष्कर्ष

समीर सुर्वे
Thursday, 20 August 2020

सदोष पर्जन्य वाहिन्यांमुळे 5 अुागस्ट रोजी गिरगाव चौपाटी, मरीन लाइन्स परीसरात पाणी तुंबले असल्याचा निष्कर्ष महानगर पालिकेने काढला आहे

मुंबई : सदोष पर्जन्य वाहिन्यांमुळे 5 अुागस्ट रोजी गिरगाव चौपाटी, मरीन लाइन्स परीसरात पाणी तुंबले असल्याचा निष्कर्ष महानगर पालिकेने काढला आहे. या भागात इतिहासात पहिल्यांदाच पाणी तुंबल्याने पालिकेने नाल्यांची तपासणी केली होती. त्यात, एक वाहीनी तुटली होती तर दुसऱ्या एका वाहीनीत बदल करण्यात आल्याने पाणि तुंबले असल्याचे आढळून आले आहे.

गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न...

5 आगस्ट रोजी शहर भागात विक्रमी पाऊस झाला होता. मात्र, 26 जुलैच्या महाप्रलयाच्यावेळीही या भागात पाणी तुंबले नव्हते. मात्र, यंदा बराच वेळ पाणी साचून राहीले होता. त्यामुळे महानगर पालिकेने या परीसरातील पर्जन्य वाहीन्यांची तपासणी केली. यात, गिरगाव चौपाटीवरुन ताडदेव च्या दिशेने जाणाऱ्या एन.एस.पाटकर मार्ग वरील जुनी वाहीनी तुटलेली आढळली. तर ,गिरगाव चौपाटी येथील नाना नानी पार्क पासून विल्सन महाविद्यालयापर्यंत असलेली जुन्या  वाहीनीचे काही वर्षांपुवी दोन भाग करण्यता आले होते. त्याच बरोबर तीन बत्ती ते  बाबुलनाथ मंदिर जंक्‍शन पर्यंत पर्जन्य वाहीनीच नसल्याचे आढळले.

पालिकेच्या डी प्रभागा कडून सीसीटीव्हीच्या मदतीने ही पाहाणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल पालिकेच्या  पर्जन्य जलवाहीन्या विभागाला सोपविण्यात आले आहेत. तसेच काही उपाय ही पर्जन्य जलवाहीन्या विभागाला सुचविण्यात आले आहे. याच दिवशी झालेल्या तुफान पावसाने मलबार हिलच्या काही भागातील दरड कोसळली होती. वाळकेश्‍वर तीन बत्ती ते बाबूलनाथ मंदिर पयत पजन्यवाहीनी नसल्याने पावसाचे पाणी बाबुलनाथ जंक्‍शनजवळ येऊन साचले होते. असाही निष्कर्ष काढण्यात आला.

 मुंबई महापालिका नॉन कोविड रुग्णांना देणार 'ही' लस, पुढल्या आठवड्यात सुरु होणार नवीन प्रयोग

विल्सन महाविद्याल जवळील वाहीनीचे दोन भाग केल्यामुळे तेथे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही.त्यामुळे या वाहीनीचे दोन भाग का करण्यात आले याचेही कारण महानगर पालिका शोधणार आहे.

हे आहेत उपाय

  • -एन.एस.पाटकर मागावरील जुन्या वाहीनीची दुरुस्ती करण्या बरोबरच तेथे पर्यायी  नवी वाहीनी बांधण्यात यावी.
  • - वाळकेश्‍वर बत्ती ते चौपाटी बन्ड स्टॅंड पयत नवी वाहीनी बांधावी लागणार. 

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC has concluded that water was flooded in Girgaum Chowpati, Marine Lines area on 5th August due to faulty rain channels