esakal | बापरे! महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर दिवसाला येतात तब्बल 'इतके' फोन; लाईनची क्षमता वाढवली..
sakal

बोलून बातमी शोधा

corona control room

हेल्पलाइन 1916 पर्यंत पोहोचू न शकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) या नंबरच्या लाईनची संख्या 30 वरून 60 केली आहे.

बापरे! महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर दिवसाला येतात तब्बल 'इतके' फोन; लाईनची क्षमता वाढवली..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेनं एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोविड केअर सुविधेविषयीच्या तक्रारी 1916 या हेल्पलाईन नंबरवर दाखल करता येतात. रुग्णांना हेल्पलाइन नंबरद्वारे नॉन कोविड खाटांची उपलब्धतेची माहिती देखील मिळते. दरम्यान महापालिकेनं या हेल्पलाईन नंबरची क्षमता वाढवली आहे. हेल्पलाइन 1916 पर्यंत पोहोचू न शकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) या नंबरच्या लाईनची संख्या 30 वरून 60 केली आहे.

महानगरपालिका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जो हेल्पलाईन नंबर चालवतो, या कक्षात दिवसात जवळपास 4 हजार कॉल येत आहेत. इतके कॉल घेणं खूपच कठिण काम आहे. या कक्षातील 48 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचारी हे क्वांरटाईन आहेत आणि अन्य कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. या नियंत्रण कक्षात कोविड -19 आणि नॉन-कोविड रुग्णालयातील बेड, रुग्णवाहिका आणि हर्न्स व्हॅनचे वाटप करण्याचे काम सोपविण्यात आलं आहे.

 मोठी बातमी - अर्णब गोस्वामी यांना पुन्हा समन्स, वांद्रे मजुर गर्दी प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा आरोप... 

प्रत्येक शिफ्टमध्ये सुमारे 15 कर्मचारी आवश्यक आहेत, मात्र सद्यस्थितीस एकूण 14 कर्मचारी उपलब्ध आहेत. प्रत्येक कर्मचारी आता दिवसाला 500 हून अधिक कॉल हाताळत आहे, त्यामुळे बहुतेक कर्मचारी डेस्कवर बसूनच जेवण करत आहेत. महापालिकेने क्वांरटाईन असलेल्या कर्मचाऱ्यांना 14 दिवस पूर्ण झाल्यावर पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. 

महापालिका सध्या अधिक कंत्राटी कर्मचारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कंट्रोल रुममध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. 

आम्ही आता आमच्या फोन लाईन्स दुप्पट केल्या आहेत आणि स्टाफ वाढविण्यासाठी व्यवस्था करीत आहोत. आम्ही एका आठवड्यात हेल्पलाइन सुव्यवस्थित करू, असे मुख्याधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितलं आहे. महेश नार्वेकर हे 30 एप्रिल रोजी ते निवृत्त होणार होते. मात्र कोविड-19 आणि आगामी पावसाळा या समस्या पाहता त्यांचा निवृत्तीचा काळ वाढवला असून ते अजूनही काम करीत आहेत.

हेही वाचा: संजय राऊतांच्या टीकेला अखेर सोनू सूदनं दिलं असं उत्तर; वाचा काय म्हणाला सोनू...

निसर्ग चक्रीवादळा दरम्यान एमटीएनएल कनेक्शनच्या अडचणीमुळे नियंत्रण कक्षाच्या कर्मचार्‍यांना हेल्पलाईनवर कॉलला उत्तर देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. बीएमसी अधिकाऱ्यानं सांगितले की, जेव्हा आम्ही त्यांना मदत करू शकलो नाही तेव्हा काही लोकप्रतिनिधींनी आम्हाला बोलावून शिवीगाळ केली. याचा टीमच्या मनोबलवर परिणाम होतो. सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कामावर येत आहेत. ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

bmc has increased number of lines for helpline number 

loading image
go to top