esakal | संजय राऊतांच्या टीकेला अखेर सोनू सूदनं दिलं असं उत्तर; वाचा काय म्हणाला सोनू...
sakal

बोलून बातमी शोधा

sonu and sanjay

अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

संजय राऊतांच्या टीकेला अखेर सोनू सूदनं दिलं असं उत्तर; वाचा काय म्हणाला सोनू...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई ः अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. सोनूनं केलेल्या कामावर रविवारी सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली होती.  यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. एकीकडे सोनूच्या कामाची चर्चा आणि कौतुक देशभरात झालं. दुसरीकडे 'सामना'च्या लेखात टीका झाली. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. दरम्यान आता संजय राऊतांच्या वक्तव्यावर सोनू सूदनं प्रतिक्रिया दिली आहे. 

वाचा ः धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोनूनं म्हटलं आहे की,  मी कोणासाठी म्हणून काही करत नाही आहे. मला फक्त श्रमिकांसाठी काहीतरी करायचं होतं. म्हणून मी हे काम सुरु केलं. संजय राऊत फार चांगले आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मी भेट घेतली. त्यांच्या सोबतची भेटही माझी चांगली झाली. माझा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. एक अभिनेता म्हणून मी माझ्या कामात आनंदी आहे. सध्या माझ्याकडे करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.

वाचा ः सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' रात्री मातोश्रीवर काय झाली होती चर्चा? वाचा...

काय म्हटलं होतं अग्रलेखात 
महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

वाचा  ः मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.

मजुरांच्या पायपीटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय ?

वाचा ः भिवंडीत मुसळधार पावसाला सुरुवात, वीजपुरवठा खंडित...

सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता
कोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,' असा प्रश्न लेखात उपस्थित केलाय. 'सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.