मोठी बातमी : मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले कोविड पॉझिटिव्ह

समीर सुर्वे
Tuesday, 21 July 2020

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांना कोविडची बाधा झाली आहे.

मुंबई : महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांना कोविडची बाधा झाली आहे. घोले हे सुरवाती पासूनच रुग्णालय आणि कोरोना हॉटस्पॉट्सना भेट देऊन तिथल्या परीस्थीतीचा आढावा घेतायत. अमेय घोले यांची आज कोविड चाचणी करण्यात ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. घोले हे युवासेनेचे खजिनदारही आहेत. कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सावध केलं गेलं आहे. सोबतच गेल्या तीन चार दिवसांपासून संपर्कात आलेल्यांनी कोविडची चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. घोले हे स्वतः मुंबईभर फिरुन आरोग्य व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत होते.

मोठी बातमी - मनीषा म्हैसकर यांनी स्विकारला पर्यावरण विभागाचा पदभार

पालिकेच्या 2 हजार 686 कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा

मुंबई महानगर पालिकेच्या 2 हजार 686 कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा झाली आहे. तर 108 कर्मचारी आणि अधिकार्यांचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्यांपासून त्यांच्या कुटूंबियांनाही कोविडची लागण होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. उपायुक्त शिरीष दिक्षीत, सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार, तसेच एका विभागप्रमुखाचा कोविडने बळी घेतला आहे. त्याचबरोबर घनकचरा विभागातील सर्वाधिक 31 आणि आरोग्य विभागातील 27 कर्मचारी कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत कर्मचार्यांच्या वारसांना 50 लाख आणि अनुकंपतत्वावर नोकरी दिली जाणार असल्याचे प्रशासनाने यापुर्वी जाहीर केलेे आहे.

( संकलन - सुमित बागुल )

BMC health committee chairman amey ghole detected corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC health committee chairman amey ghole detected corona positive