esakal | BMC : कोविड, पावसाळी आजारांची लक्षणं असल्यास 'वॉर्ड वॉर रुम'ला संपर्क करा
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : कोविड, पावसाळी आजारांची लक्षणं असल्यास 'वॉर्ड वॉर रुम'ला संपर्क करा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुबई : कोविडची दुसरी लाट (Covid Second Wave) सध्या ओसरत असली तरी अजूनही रुग्णसंख्या (Covid Patients) 500 च्या घरात आहे. त्यामुळे, नागरिकांनी जास्तीत जास्त कोविड प्रतिबंधात्मक उपायांचा (Covid treatments) अवलंब करणे आवश्यक असून कोरोनाला रोखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन वारंवार पालिकेकडून (BMC) केले जात आहे. मात्र, आता पावसाने पुन्हा जोर धरल्याने पावसाळी आजारांचे संकट (Monsson Deceases) मुंबईवर आहे. ज्यामुळे, मुंबईत पावसाळी आजारांचे रुग्ण (Monsoon Patient) वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, कोविडसह पावसाळी आजारांवरील लक्षणांसाठी वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या वॉर्ड वॉर रुम्समधून तपासणीसह उपचारांच्या माहितीसाठी वॉर रुमचे डॉक्टर्स (Ward Room Doctors) मार्गदर्शन करणार असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधून लक्षणे, चाचण्यांची सुविधा आणि उपचारांची केंद्र जाणून घेऊ शकतात. ( BMC invocates covid and monsson decease patients direct contact to ward room- nss91)

वॉर्ड वॉर रुमचा उपयोग इतर आजारांसाठी

वॉर्ड वॉर रुमचा उपयोग फक्त कोविडसाठी न करता इतर आजारांसाठी होऊ शकतो. त्यानुसार, पावसाळी आजारांसाठी ही नागरिकांना वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधता येणार आहे.  वॉर्ड वॉर रुमशी संपर्क केल्यास कोणत्या वॉर्डमधून लेप्टो, स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत याची माहिती मिळेल आणि त्यातून एक डेटा तयार करता येईल.

हेही वाचा: आरोपी विक्रम भावेच्या वडिलांचे निधन, गावी जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी

हेल्थकेअर वर्कर्सची घेणार मदत

ज्या छोट्या-छोट्या पॉकेट्समध्ये पावसाळी आजारांचे रुग्ण आढळतील त्यांचे निदान आणि नोंद लवकरात लवकर करता येईल. या पॉकेट्समध्ये सापडणाऱ्या रुग्णांसाठी हेल्थकेअर वर्कर्सची मदत घेऊन तिथेच आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

डॉ. रमेश भारमल,संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले असतानाच आता पावसाळी आजारांचा धोका बळावतोय . मलेरिया, डेंग्यू, कावीळ हे आजार डोकेवर काढत असून जानेवारी ते 11 जुलै 2021 पर्यंत  मलेरियाचे 1,991,  गॅस्ट्रो 1,384 तर डेंग्युच्या 57 रुग्णांची नोंद झाली आहे. तर,  पावसाळी आजारांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे, पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

जानेवारी ते 11 जुलैपर्यंतची आकडेवारी

मलेरिया - 1,991

गॅस्ट्रो - 1,384

लप्टो - 74

डेंग्यू - 57

हिवताप - 95

एच 1, एन 1 - 19

स्वत: उपचार घेणे टाळा

स्वत: उपचार घेणे टाळा. ज्यामुळे, गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका कमी होईल. ताप, डोकेदुखी, मायाल्जिया, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळल्यास वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधा. तिथून योग्य ती माहिती डॉक्टरांमार्फत उपलब्ध होऊ शकते.  किंवा डॉक्टर्स आणि जवळच्या पालिकेच्या आरोग्य केंद्रांवर जाऊन सल्ला घ्या.

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

loading image