esakal | विक्रम भावेच्या वडिलांचे निधन, गावी जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

vikram bhave

आरोपी विक्रम भावेच्या वडिलांचे निधन, गावी जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांच्या हत्या (Murder) प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला (Vikram Bhave) वडिलांच्या निधनामुळे (Fathers Death) रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज दिली. भावेला उच्च न्यायालयाने यापूर्वी जामीन (Bail) मंजूर केला आहे. यामध्ये दिलेल्या अटींमध्ये पुणे जिल्ह्याबाहेर (Pune) जाण्यासाठी मनाई केली होती. ही अट शिथिल करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. (Dr Narendra Dabholkar murder case vikram Bhave gets permission to go ratnagiri says HC - nss91)

न्या. एस. एस .शिंदे आणि न्या. एन .जे जमादार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. भावेच्या वडिलांचे रत्नागिरीमध्ये नुकतेच निधन झाले. वडिलांच्या अंतिम विधींसाठी आणि बँकेचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी रत्नागिरी मध्ये चार आठवड्यांसाठी जाण्याची परवानगी त्याने मागितली होती. खंडपीठाने तीन आठवड्यासाठी ही परवानगी दिली आहे. तसेच यादरम्यान देवरुख पोलीस ठाण्यात दर रविवारी हजेरी लावावी आणि पुण्यात परत आल्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा: राजकुमार हिरानीचा मुलगा असल्याची बतावणी, इंन्स्टाग्रामवरुन फसवणूक

हिंदू विधीज्ञ परिषदेत भावे कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे, शरद काळसकर आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांच्या चौकशीनंतर भावेला अटक केली होती. अंदुरे आणि काळसकरला मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दाभोलकर यांची ओळख पटविण्यात आणि हत्यारे नष्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पुण्यात ता 20 ऑगस्ट 2013 मध्ये दाभोलकर यांची हत्या झाली होती. भावेला एक लाख रूपयांचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.

loading image