esakal | महापालिका मासे विक्रेत्यांसाठी फोर्टमध्येच बनवणार तात्पुरता शेड
sakal

बोलून बातमी शोधा

fish market

महापालिका मासे विक्रेत्यांसाठी फोर्टमध्येच बनवणार तात्पुरता शेड

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज ( Mumbai fort) मंडईतील मासे विक्रेत्यांना (fish venders) त्याच भागात वर्षभरासाठी तात्पुरती शेड बनवून देण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका (BMC) 3 कोटी 35 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. ( BMC makes temporary shelter for fish venders in fort itself-nss91)

छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्यानंतर महानगर पालिकेने 2018 मध्ये पाडून टाकली होती.मात्र,पहिल्या मजल्या पासून बांधकाम पाडण्यात आले नव्हते.तळमजल्यावरील मासळी बाजार हलविण्यात आला नव्हता.आता महानगर पालिकेने या ठिकाणी नवी इमारत बांधणार आहे.त्यासाठी तळमजल्यावरील मासळी बाजाराचे स्थालांतर करायचे होते.

हेही वाचा: शिक्षक परिषदेचा 'या' कार्यालयाला 'टाळे ठोका' आंदोलनाचा इशारा

पालिकेने यासाठी मासेविक्रेत्यांना काही पर्याय दिले होते.मात्र,ही जागा सोडून दुरच्या ठिकाणी जाण्यास विक्रेत्यांनी नकार दिला होता.त्यामुळे आता या परीसरातच पालिका मासे विक्रेत्यासाठी तात्पुरती शेड उभारणार आहे.या शेड उभारणीच्या कामाला या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

वर्षात नव्या इमारतीत स्थालांतर

या इमारतीचे बांधकाम ऑगस्ट 2022 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षीत आहे.ही इमारत उभी राहील्यावर तत्काळ मासेविक्रेत्यांचे नव्या जागात स्थालांतर करण्यात येणार आहे. हा मुंबईतील महत्वाचा घाऊक मासळी बाजार आहे.

loading image
go to top