

Minister Denies Allegations Over Mayor Reservation Draw
Esakal
Objection on BMC Mayor Reservation : राज्यातल्या २९ महानगरपालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. मुंबईत सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झालं आहे. यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. चक्राकार पद्धतीने एसटी प्रवर्गातील आरक्षण जाहीर व्हायला हवं होतं. मात्र तसं न करता सत्ताधाऱ्यांच्या सोयीने आरक्षण सोडत काढल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. यावर राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आरक्षण सोडत नियमानुसार काढल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं. ओबीसींचे आरक्षण कसे जाहीर केले यावरही माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली.