मोठी बातमी - मुंबईत शाळांचे ऑनलाईन वर्ग 15 जूनपासून?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 15 जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरु  होण्याची शक्यता आहे

मुंबई : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 15 जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरु  होण्याची शक्यता आहे. याबाबत सोमवारी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे दीड लाख विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात. याबाबत शिक्षकांमार्फत पालकांशी संपर्क साधला जात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध साधनांचा अंदाज घेतला जात आहे, असे शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल, असे ते म्हणाले.

मोठी बातमी महत्त्वाचं संशोधन, ब्लड कॅन्सरवरील 'हे' औषध करू शकतं कोरोना रुग्णांना बरं ?

शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी पूर्व उपनगरातील महापालिका, खासगी अनुदानित आणि विना-अनुदानित शाळांमधील 7000 हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. पश्चिम उपनगरातील शिक्षकांचे मंगळवारी आणि शहर विभागातील शिक्षकांचे 10 जूनला ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे.

दीक्षा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून हे प्रशिक्षण घेतले जात आहे. मोबाईल ऍप्लिकेशनवर बालभारतीची पुस्तकेही उपलब्ध असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी शिक्षण समितीच्या अध्यक्ष अंजली नाईक, विधी समितीच्या अध्यक्ष शीतल म्हात्रे, शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षण सहआयुक्त आशुतोष सलील, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते.

मोठी बातमी मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव तुमच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज...

कौशल्य विकासावर भर

नवीन आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शिक्षक व अधिकाऱ्यांचे समुपदेशन करणे, सर्व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी ॲनिमेशन, प्रेझेंटेशन, व्हिडीओ क्लिप्स तयार करण्याचे प्रशिक्षण देणे हा कार्यशाळांचा हेतू असल्याचे महापौरांनी सांगितले. झूम, गुगल मीट, गुगल क्रोम, फेसबुक, टि्वटर, टेलिग्राम, व्हॉटस्ॲप, हॅंगआऊट या माध्यमांतून विद्यार्थ्यांना शाळेचा अनुभव देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

bmc might start online education from 15th june read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc might start online education from 15th june read full news