VIDEO: मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोस्टल रोडवर महाकाय गर्डरची यशस्वी जोडणी

BMC Mumbai Coastal Road: पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली.
Coastal Road
Coastal Road

नवी दिल्ली- बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. महत्त्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाने आज शुक्रवार दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली आहे. आज पहाटे मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला जोडणारे गर्डर बसवण्यात आले आहे. (Bandra Worli sea bridge route)

बीएमसीने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बीएमसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली. या अभियांत्रिकी कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी स्वतः प्रकल्प स्थळी उपस्थित होते.

Coastal Road
BMC Khichadi Scam: बीएमसी खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; युवासेनेच्या सूरज चव्हाणला अटक

कामगिरीबद्दल उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) श्री. गिरीश निकम यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांचे महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सैनी यांनी अभिनंदन केल्याचं, असं बीएमसीने ट्वीटमध्ये म्हटलंय.

Coastal Road
Covid Centre Scam: कोविड सेंटरमध्ये बीएमसी अधिकाऱ्यांना वाटले 60 लाख रुपयांचे सोने, ईडीचा मोठा खुलासा

स्थापन केलेली तुळई (गर्डर) ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. लवकरच दुसरी तुळई देखील स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करून मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा देखील सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com