esakal | चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले
sakal

बोलून बातमी शोधा

चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले

नायर रुग्णालयानं पुन्हा एकदा कोविड नसलेल्या रुग्णांसाठी आपले दरवाजे खुले केलेत. आता १५० खाटा सामान्य रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून काही बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) देखील सुरू करण्यात आलेत. 

चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  तब्बल ६ हजार कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर बीएमसी संचालित बीवायएल नायर रुग्णालयानं पुन्हा एकदा कोविड नसलेल्या रुग्णांसाठी आपले दरवाजे खुले केलेत. आता १५० खाटा सामान्य रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून काही बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) देखील सुरू करण्यात आलेत. 

बीएमसीद्वारे चालवण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या नायर रुग्णालयाचं रुपांतर गेल्या  चार महिन्यांपासून कोविड-१९ च्या सुविधेसाठी उपलब्ध करुन दिलं होतं. या रुग्णालयात १,०४३ बेड्ससह ११० आयसीयू बेडचा समावेश होता. या आठवड्यात रुग्णालयानं कोविड नसलेल्या रुग्णांसाठी रुग्णालय सुरु केलं आहे.  काही ओपीडी सुरु करण्यात आले असून त्यात कार्डिओलॉजी, त्वचाविज्ञान, नेत्ररोगशास्त्र, सामान्य शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया आणि मनोरुग्ण अशा विभागांचा समावेश आहे. 

एप्रिल महिन्यातच नायर रुग्णालयानं आपल्या सर्व नॉन-कोविड रूग्णांना त्याच्या इतर बीएमसी-सुविधा असलेल्या रुग्णालयात हस्तांतरित करण्यास सुरुवात केली. जेणेकरुन नायर रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठं कोविड-१९साठी सुविधा बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचाः  २७ जुलैला शुभेच्छा नको; करा 'हे' कामं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोविड-१९ च्या काळात जेव्हा शहरात बेडची कमतरता होती तेव्हा नायर रुग्णालयाची भूमिका महत्त्वाची ठरली.  आतापर्यंत, रुग्णालयात ६,०८५ कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचार करण्यात आलेत आणि ५०० कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या मातांची प्रसूती देखील केली आहे. 

रुग्णालयाचे डीन डॉ मोहन जोशी म्हणाले, गेल्या आठवड्यात, अनेक डॉक्टरांनी कोविड नसलेल्या रूग्णांच्या उपचाराबद्दल चिंता व्यक्त केली. म्हणून आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना करुन त्यांच्यावर पुन्हा  उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रथम कार्डिओलॉजी विभाग सुरू केला आहे, सामान्य शस्त्रक्रिया देखील सुरू झाल्यात. आम्ही हळूहळू सुरु करत आहोत. कारण सध्या आमच्या रूग्णालयात एक हजाराहून अधिक कोविड रुग्ण आहेत. रुग्णालयात कोविड नसलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असेल.

अधिक वाचाः अरे वाह... ही तर दिलासा देणारी बातमी! मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला इतक्या दिवसांवर

एका  पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, बहुतेक कोविड-१९ रूग्णांना मोठ्या सुविधा असलेल्या एमएमआरडीए, नेस्को, महालक्ष्मी रेसकोर्स, एनएससीआय तसंच मुलुंड आणि दहिसर येथे हलवण्याची योजना करण्यात येत आहे. नायर, केईएम आणि सायन रुग्णालयात केवळ गंभीर रूग्णांवरच उपचार केले जातील.

BMC Nair Hospital now open to non Covid patients With out patient departments