esakal | BMC : स्थानिकांचे लसीकरण वाढवण्यासाठी 'हा' नवीन प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

BMC : स्थानिकांचे लसीकरण वाढवण्यासाठी 'हा' नवीन प्लॅन

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : स्थानिकांच्या लसीकरणाचा (corona vaccination) टक्का वाढविण्यासाठी महानगरपालिका (BMC) आता कॉर्पोरेट कंपन्या (corporate companies) आणि सामाजिक संस्थांची मदत (social organization) घेणार आहे. या माध्यमातून लसीकरण शिबीर राबवून वॉकईन लसीकरणाला (walk in vaccination) प्राधान्य देण्यात येणार आहे. ( BMC on new plan for increasing vaccination for locals - nss91)

मुंबईत आता पर्यंत लस घेतलेल्यांपैकी ३० टक्के नागरीक हे मुंबई बाहेरील असल्याची शक्यता आहे.यात,मुंबईत नोकरीसाठी येणारे,कारखान्यांमध्ये राहाणारे कामगार यासह आजूबाजूच्या शहरातील नागरीकांचा समावेश आहे.त्यातच झोपडपट्टीतही लसीकरणाचा टक्का कमी आहे.त्यामुळे महानगर पालिकेने आता लसीकरण शिबीर घेण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रा सरकारकडून मिळणाऱ्या लस यासाठी वापरता येणार नसल्याने महानगर पालिका खासगी कंपन्यांचे सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंडच्या माध्यमातून लसीची खरेदी करुन तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण शिबीर राबविण्याचा विचार पुढे आला आहे.

हेही वाचा: Corona : मुंबईत आणखी दोन 'डेल्टाप्लस व्हेरियंट'च्या रुग्णांचे निदान

लसीकरण शिबीर राबविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.स्थानिक पातळीवर शिबीर राबवण्यास सुरवात झाल्यास पालिकेच्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दीही कमी होईल.तसेच,नागरीकांनाही घराजवळ लस मिळणार असल्यास त्यांचाही फायदा होईल.

अशी असेल मोहीम

पालिका आता लस खरेदी करु शकत नाही.त्यामुळे खासगी कंपन्या त्यांच्याकडील निधी वापरून त्यातून लस खरेदी करतील.या लस साठ्यातून पालिका सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण शिबीर भरवेल. या कंपन्यांना लस थेट उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करता येणार नाही त्यांना ही लस रुग्णांकडून खरेदी करावी लागेल.काही रुग्णालयांकडे अतिरीक्त साठा असल्याने त्यांना लस उपलब्ध होऊ शकते. शिबीरात वॉकईन पध्दतीनेच लसीकरण होणार आहे.त्यामुळे स्थानिक लोकच याचा फायदा घेऊ शकतील.

loading image
go to top