esakal | Corona : मुंबईत आणखी दोन 'डेल्टाप्लस व्हेरियंट'च्या रुग्णांचे निदान
sakal

बोलून बातमी शोधा

Delta plus virus

Corona : मुंबईत आणखी दोन 'डेल्टाप्लस व्हेरियंट'च्या रुग्णांचे निदान

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत (Mumbai) आणखी दोन डेटा प्लस व्हेरियंट्सचे रुग्ण (delta plus variant patient) सापडले असून मुंबईतील डेल्टा प्लस व्हेरियंट्स (Mumbai delta plus patient) रुग्णांची एकूण संख्या 3 झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे रुग्ण वाढत असल्याने चिंता देखील वाढली आहे. ( two delta plus variant patients found in mumbai-nss91)

मे आणि जून महिन्यात काही रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील संशयित रुग्णांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात दोन रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाली असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले.

हेही वाचा: राज कुंद्राच्या लॅपटाॅप मध्ये अश्लील चित्रपट, पोलिसांचा हायकोर्टात दावा

डेल्टा प्लस व्हेरिएन्ट आढळलेले दोन्ही महिला रुग्ण आहेत. हे दोन रुग्ण डेल्टा प्लस व्हेरिएन्ट(AY.1 ) प्रकारचा असून त्याबाबत राज्य सरकारला 16 जुलै ला कळविण्यात आले आहे. यातील पहिली महिला रुग्ण 28 वर्षीय महिला असून ती 28 जून ला कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती.तिला डोकेदुखी,ताप ही लक्षणे होती. या महिला रुग्णाचे लसीकरण झालेले नव्हते असे ही काकाणी यांनी सांगितले.

तर दुसरा रुग्ण ही 57 वर्षीय महिला नर्स असून 29 जून रोजी ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती. तिचे लसीकरण झाले असून तिला कोव्हीशिल्डचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत असे काकाणी म्हणाले. दोन्ही महिला रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णांना सुरुवातीला ऑक्सिजन वर ठेवण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून दोन्ही रुग्ण बरे झाले असल्याचे ही काकाणी यांनी सांगितले. दोन्ही पैकी एकाही रुग्णाची ट्रॅव्हलिंग हिस्टरी नसल्याचे ही काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

यापूर्वी मुंबईत एक डेल्टा प्लस बाधित रुग्ण सापडला होता. एकूण रुग्णसंख्या 3 झाली आहे. नव्याने सापडलेले बरे झाले असून घरी देखील गेले आहेत असे काकाणी पुढे म्हणाले. या रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात आले असून त्यांच्या आरोग्याची माहिती दररोज घेतली जाते. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या 4 व्यक्तींचे 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' करण्यात आले असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सीन साठी पाठवण्यात आले असून त्यांचा चाचणी अहवाल अद्याप आला नसल्याचे ही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

मुंबईतून साधारणता 600 पेक्षा अधिक संशयित डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल साधारणता दोन महिन्यांनी येतो. आतापर्यंत पाठवलेल्या एकूण नामुन्यांपैकी 3 नमुने डेल्टा प्लस व्हेरिएन्ट चे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील आठवड्याभरात कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा कार्यरत होणार असून चाचणीचे अहवाल चार दिवसात प्राप्त होणार असल्याचे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

loading image
go to top