esakal | महापालिका रुग्णालयाच्या प्राणवायू प्रकल्पात ३२० कोटींचा घोटाळा ? - अस्लम शेख
sakal

बोलून बातमी शोधा

Aslam Shaikh

महापालिका रुग्णालयाच्या प्राणवायू प्रकल्पात ३२० कोटींचा घोटाळा ? - अस्लम शेख

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : कोविडच्या तीसऱ्या लाटेसाठी (Corona Virus) महानगर पालिका रुग्णालयात (BMC Hospital) उभारण्यात येणाऱ्या प्राणवायू प्रकल्पाच्या (oxygen) उभारणीत 320 कोटी रुपयांचा घोटाळा (Money Fraud) झाल्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे. संबंधीत कंत्राटदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करुन पहिली कामे पुर्ण होई पर्यंत पुढील कामे दिले जाऊ नये असे पत्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी दिले आहे.तसेच,या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ( BMC Oxygen project crore rupees corruption may there says Minister Aslam Sheikh-nss91)

हेही वाचा: अकरावी प्रवेशाची CET परीक्षा 21 ऑगस्टला, जाणून घ्या सविस्तर माहिती

महानगर पालिका रुग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारत आहे.मात्र,हे प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळालेली कंपनीला जयपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात असेच काम करु न शकल्याने काळ्यायादीत टाकले आहे.तसेच,पालिकेने राणीच्या बागेतील कामातही या कंपनीला दंड केला आहे.असे असतानाही याच कंपनीला पुन्हा कंत्राट दिले जात आहे.तब्बल 320 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोपही अस्लम शेख यांनी केला आहे.यापुर्वी भाजपनेही या प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप केला होता. इतर महानगर पालिका राज्य सरकार ज्या दराने हे प्रकल्प उभारत आहे त्या पेक्षा तीप्पट दराने महानगर पालिका हे प्रकल्प उभारत आहे.काही रुग्णालयातील हे प्रकल्प 17 जुलै पर्यंत पुर्ण होणे गरजेचे होते.मात्र,अद्याप हे प्रकल्प पुर्ण झालेले नाहीत.त्यामुळे हे प्रकल्प पुर्ण होई पर्यंत पुढील कामांचे कार्याध्येश देऊ नये असेही अस्लम शेख यांनी या पत्रात नमुद केले आहे.

loading image