रेमडेसिवीर इंजेक्शनचे 75 हजार नग मुंबई महापालिका विकत घेणार

रेमडेसिवीर इंजेक्शनचे 75 हजार नग मुंबई महापालिका विकत घेणार

मुंबई: कोविड उपचारासाठी प्रभावी असलेले  रेमडेसिवीर इंजेक्शनचे 75 हजार नग मुंबई महापालिका विकत घेणार आहे. त्यातील 10 हजार नग पालिकेला मिळाले आहेत. महापालिकेच्या रुग्णांना हे हजारो रुपये किंमतीची इंजेक्शन मोफत मिळण्याची शक्यता आहे.

कोविडचा रुग्ण अत्यावस्थ होण्याच्या पूर्वीच्या स्टेजला असताना हे इंजेक्शन दिले जाते. त्याचा चांगला परिणामही होत असून देशभरात या इंजेक्शनचा वापर होत आहे. साधारण 5 हजार रुपयांपर्यंत या औषधांची किंमत असून अनेक वेळा हे इंजेक्शन उपलब्धही होत नाही. महापालिकेने 72 हजार नग खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील 10 हजार इंजेक्शन पालिकेला मिळाले आहेत. रुग्णालय आणि कोविड केंद्रात या इंजेक्शनचे वितरण करण्यात आले आहे.

रुग्णालयातील साठा 

  • सेव्हन हिल्स रुग्णालय  1500
  • के. ई. एम. रुग्णालय, परळ 800 
  • नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल 800
  • संचालक (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये) 1700
  • लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, शीव  800
  • कूपर रुग्णालय, विलेपार्ले 600
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी 500
  • प्रमुख वैद्यकिय अधीक्षक आणि उपनगरीय रुग्णालये 1000


कोविड केंद्र

  • बी. के. सी. (एम.एम.आर.डी.ए.) कोविड सेंटर 500
  • दहिसर कोविड सेंटर 500
  • नेस्को कोविड सेंटर, गोरेगांव 500
  • एन. एस. सी. आय. कोविड सेंटर, वरळी 500
  • रिचर्डसन ऍण्ड क्रुडास, मुलुंड 300

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती आता फक्त एका कॉलवर

अनेक भागांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे, आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधून रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.  

रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी एफडीएच्या मुंबईतील मुख्यालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यरत नियंत्रण कक्षामधून रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर मागणी आणि त्याची पूर्ततेसंदर्भातील माहिती आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध होणार आहे. सध्या प्रत्येक कोविड संशयित आणि कोविडग्रस्त रुग्णांस सुरवातीपासून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत असल्याने त्याची मागणी भरपूर वाढली आहे. 

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

BMC procure 75 thousand units Remedesivir injection covid treatment

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com