धारावीत झपाट्याने पसरतोय कोरोना, बाधितांचा आणि मृतांचा आकडा चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने  होत असून धारावीत गेल्या 24 तासांत एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे.

मुंबई  :  धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून धारावीत गेल्या 24 तासांत एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. तर 53 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,478 वर पोहोचली असून आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला,  कुंची कुरवे नगर, या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,478 वर पोहोचली असून त्यापैकी 57 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाची बातमी : कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

दरम्यान,  दादर मध्ये आज 13 नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 205 झाली आहे. तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर माहीममध्ये कोरोनाचे आज 23 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 286 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

number of corona positive in dharavi is near to one thousand five handred


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona positive in dharavi is near to one thousand five handred