BMC-Office
BMC-Office

सुपर स्प्रेडर्सपासून कोरोना रोखण्यासाठी BMC कडे प्लान तयार

कोण आहेत हे सुपर स्प्रेडर्स?

मुंबई: मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. या परिस्थितीत संभाव्य सुपर स्प्रेडर्सपासून (super spreaders) कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांचे प्राधान्याने लसीकरण (vaccination) करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संभाव्य सुपर स्प्रेडर्स दररोज अनेकांच्या संपर्कात येत असतात. त्यातून कोरोनाच फैलाव होतो. या सुपर स्प्रेडर्सच्या वर्गात रिक्षा चालक, टॅक्सी ड्रायव्हर, फेरीवाले, डिलिव्हरी बॉय, हॉटेलमध्ये कर्मचारी, डेली वेज लेबर यांचा समावेश होतो. (Bmc ready with plan to stop corona spread from super spreaders)

केंद्र सरकारने १८ वर्ष वयोगटावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाला सोमवारपासून परवागनी दिली असली, तरी राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबईत फक्त ३० वर्षावरील वयोगटाचे लसीकरण होईल. सुपर स्प्रेडर्स गटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वेगवेगळया पर्यायांवर महापालिका विचार करत आहे. लवकरच महापालिका या आठवड्यात या संदर्भात निर्णय घेईल.

BMC-Office
BMC मुंबई लोकल सेवेबाबत गुरुवारपर्यंत घेणार निर्णय

यापूर्वी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी याच गटातील नागरिकांच्या सरकट चाचण्या करण्यात आल्या होत्या. सुपर स्प्रेडर्सच्या लसीकरणासाठी वॉक इनचा एक पर्याय आहे. पण या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही. सुपर स्प्रेडर्सच्या वयोगटात १८ वर्षावरील व्यक्तीचा समावेश करायचा की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार फक्त ३० पुढील लोकांसाठीच लसीकरण सुरु ठेवायचे यावरही विचारमंथन सुरु आहे.

BMC-Office
महाविकास आघाडीला झटका, BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

राज्य सरकारने शुक्रवारी ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली. लस पुरवठा कसा होतोय, त्या नुसार १८ ते ४५ वयोगटासाठी टप्याटप्याने लसीकरण सुरु होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com