

Mumbai hospital patient treatment deadline
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : रुग्णांना ताटकाळत ठेवणे, उपचार न देता दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने पालिकेच्या रुग्णालयांसाठी नवीन आपत्कालीन नियमावली लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार, आपत्कालीन विभागात आलेल्या रुग्णाची ३० मिनिटांच्या आत तपासणी आणि उपचार सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमावलीचे पालन न झाल्यास संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशानाकडून देण्यात आला आहे.