
Chhath Puja
ESakal
मुंबई : मुंबईत छठपूजेची तयारी जोरात सुरू झाली आहे. मुंबईत २७ व २८ ऑक्टोबर रोजी छटपूजा होणार आहे. यावेळी शहरात मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. भाविकांसाठी हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी बीएमसीने योजना जाहीर केली आहे. मुंबई परिसरात छटपूजा उत्सवात महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात आल्या असून उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्टसेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहील.