BMC स्थायी समितीच्या बैठकीचा वाद आता उच्च न्यायालयात; मंगळवारी होणार तातडीने सुनावणी

सुनिता महामुणकर
Monday, 19 October 2020

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला आहे

 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत तब्बल 674 ठरावांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी सुनावणी घेण्याच्या महापालिकेच्या नियोजित मसुद्याला नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आज केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मुंबईतल्या मैदानांची देखभालीसाठी कंत्राटदारांचा पालिकेला शून्य प्रतिसाद

महापालिकेच्या समितीने ता. 16 रोजी बुधवारी होणाऱ्या बैठकिचा मसुदा जाहीर केला. यामध्ये सुमारे 674 मुद्दे एकाच दिवशी एकाच बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने तातडीने या मुद्यांवर विनाचर्चा मंजुरी मिळावी या दूषित हेतूने हा प्रस्ताव मांडला आहे, ऑनलाईन सुनावणीमध्ये एवढे प्रस्ताव कशासाठी आहेत, असा सवाल याचिकेत केला आहे. लॉकडाऊननंतर होणारी ही पहिलीच बैठक असणार आहे. मुंबई आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणारे हे प्रश्न चर्चेविना समंत होता कामा नये, त्यामुळे प्रत्यक्ष बैठकीत यावर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. मे महिण्यातही समितीने बैठक आयोजित केली होती, त्यावेळी सुमारे ऐंशी प्रस्ताव निर्धारित होते. मात्र संसर्गामुळे ती होऊ शकली नाही. तेदेखील अजूनही प्रलंबित आहेत. ऑनलाईन सुनावणीमध्ये प्रत्येक प्रश्नावर चर्चा करणे अजिबात शक्य नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक महापालिकेच्या वतीने अशाप्रकारची बैठक ठेवली आहे, असा आरोप याचिकेत केला आहे. आतापर्यंत कोणत्याही कारकिर्दीत अशी बैठक आयोजित करण्यात आली नव्हती, असा दावाही करण्यात आला आहे.

आजपासून कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता; मुंबईतही मेघगर्जनेसह बरसणार

नुकताच 27 समित्यांसाठीच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्ती प्रत्यक्ष घेण्यात आल्या होत्या. मग आता ही तशाच प्रकारे बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. याचिकेचा उल्लेख आज मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला. न्यायालयाने उद्या यावर तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Standing Committee meeting dispute now in High Court An urgent hearing will be held on Tuesday