धोकादायक इमारतींच्याविरोधात महापालिकेची नोटीस; थेट वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यास सुरवात

समीर सुर्वे
Wednesday, 30 September 2020

धोकादायक इमारतींच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. शिव कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीतील धोकादायक  इमारतींचे विज पाणी कापण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मुंबई : धोकादायक इमारतींच्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. शिव कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीतील धोकादायक इमारतींचे विज पाणी कापण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

या कॉलनीतील 25 इमारती धोकादायक असून त्यातील 18 इमारतींचे विज पाणी काल (मंगळवारी) कापण्यात आले आहे. तर उर्वरीत 7 इमारतीचे विज पाणी आज कापण्यात येणार आहे.धोकादायक इमारत रिकामी करण्याची नोटीस दिल्यानंतर मुदतीत इमारत रिकामी न झाल्यास पालिकेकडून विज पाणी कापण्याची कारवाई केली जाते.

महत्त्वाची बातमी : बॉलिवूडमधील तीन सुपर-डुपर स्टार्स NCB च्या रडारवर, नावांची आद्याक्षरं आहेत एस,आर आणि ए

फोर्टयेथील भानुशाली इमारत दुर्घटना, डोंगरी येथील मिश्रा इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा  ऐरणीवर आला आहे. सायन कोळीवाडा येथील पंजाब काॅलनीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने पुर्वी पाठवलेल्या नोटीसला रहिवाशांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने या इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश रहिवाशांना दिले. त्यानुसार पालिकेने ही कारवाई सुरु केली आहे.

या 25 इमारतीमधिल प्रत्येक इमारतीत 48 खोल्या आहेत.या कॉलनीतील 70-80 टक्के रहिवाशी यापुर्वीच इमारत सोडून गेले आहेत.तर 20-30 टक्के रहिवाशांमुळे कारवाई रखडली होती.न्यायालयाचे आदेश मिळताच पालिकेने रहिवाशांना 48 तासात घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली.त्यानंतर कारवाई सुरु केली.\

( संपादन - सुमित बागुल ) 

BMC started taking action against dangerous and old buildings in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC started taking action against dangerous and old buildings in mumbai

Tags
टॉपिकस
Topic Tags: