बॉलिवूडमधील तीन सुपर-डुपर स्टार्स NCB च्या रडारवर, नावांची आद्याक्षरं आहेत एस,आर आणि ए

सुमित बागुल
Tuesday, 29 September 2020

NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून येत्या काळात तीन बड्या अभिनेत्यांना समन्स धाडला जाणार आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि त्यानंतर सुरु झालेला तपास. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्सचा अँगल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपासाला जातोय. यामध्ये आतापर्यंत रिया, रियाचा भाऊ शोविक, सुशांतच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अन्य काहींना न्यायालयीन कोठडीत चैकशीसाठी ठेवण्यात आलंय. रिया आणि शोविकच्या चौकशीतन जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मुंबईत NCB ने छापेमारी केली. यामध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सना ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान NCB ने ड्रग्स अँगल तपासात असताना बॉलिवूडमधील सध्याच्या घडीची सर्वात मोठी अभिनेत्री दिपीका पदुकोणसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीतसिंह या बड्या अभिनेत्र्यांना समन्स धाडला. त्यांची चौकशीही झाली.  

महत्त्वाची बातमी : रिया शोविकच्या जामिनाला NCB चा विरोध, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

आता एक मोठी आणि धक्कादायक माहिती NCB च्या सूत्रांकडून समोर येतेय. NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून येत्या काळात तीन बड्या अभिनेत्यांना समन्स धाडला जाणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे. NCB सूत्रांच्या माहितीनुसार आता 'एस', 'आर' आणि 'ए' या अक्षरांवरुन नावं सुरु होणाऱ्या बॉलिवूडमधील दिग्गज, सुपर डुपर बड्या अभिनेत्यांना चौकशीसाठी बोलावलं जाणार असल्याची शक्यता आहे.  

NCB ने या स्टार्सची नावं प्रसिद्ध न करण्याची विनंती केली आहे. NCB तपासात  या बड्या स्टार्सची नावं समोर आली आहेत. पुढील आठवड्यात याबाबत समन्स आणि चौकशीची शक्यता आहे. bollywood stars with the initials S R and A are on the hitlist of NCB. 

bollywood stars with the initials S R and A are on the hitlist of NCB


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood stars with the initials S R and A are on the hitlist of NCB