मुंबई महापालिकेची मुदत आज संपणार, ३८ वर्षानंतर प्रशासकाची नियुक्ती|BMC Termination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC Termination

मुंबई महापालिकेची मुदत आज संपणार, ३८ वर्षानंतर प्रशासकाची नियुक्ती

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC Termination) मुदत आज ७ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच महापालिका निवडणुका (BMC Election) झाल्या नसल्यानं मुंबई महापालिकेवर उद्यापासून प्रशासक नेमण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाने ९ फेब्रुवारीला घोषणा केली होती.

हेही वाचा: मुंबई महापालिका - शेवटच्या दिवशी साडेतीन हजार कोटींचा फैसला

महापालिकांची मुदत संपेपर्यंत निवडणुका झाल्या नाही तर त्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने ९ फेब्रवारीला घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला असून उद्यापासून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे.

आज स्थायी समितीची शेवटची बैठक -

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज शेवटची बैठक पार पडणार आहे. 160 पेक्षा अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. सुमारे पाच हजार कोटींचे हे प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत १८० प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

३८ वर्षानंतर मुंबई पालिकेवर प्रशासक -

मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदा १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या कार्यकाळात प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ३८ वर्षानंतर आज महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे उद्यापासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात दिला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना आपल्या पदाचा वापर करता येणार नाही.

पालिकेला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ -

मुंबई महापालिकेला १९७८, १९८५ तसेच १९९० मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. १९९० मध्ये महिला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने १९९० ते १९९२ या दोन वर्षांसाठी महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली होती.

Web Title: Bmc Term End Today 7 March 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BMC
go to top