९९ टक्के लसीकरण पूर्ण; १२५ केंद्रे बंद करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार | BMC News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Center

९९ टक्के लसीकरण पूर्ण; १२५ केंद्रे बंद करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार

मुंबई : मुंबईतील ९९ टक्के नागरिकांचे लसीकरण (corona vaccination) पूर्ण झाले असल्याने आता ३५० पैकी १२५ केंद्रे बंद करण्याचा विचार महापालिका (bmc) करत आहे. त्याबाबत १५ दिवसांतील लसीकरणाचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. केंद्रे बंद केल्यास आवश्यकतेनुसार शिबिरे (corona vaccination drive) घेण्याचा पालिकेचा विचार आहे. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. १८ वर्षांवरील पात्र असलेल्या ९२ लाख प्रौढांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. ९९ टक्के प्रौढांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. १५ वर्षांवरील साडेपाच लाभार्थींपैकी ६१ टक्के जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाचे सिनेट अधिवेशन; प्राध्यापक, परिषदेचे सदस्यही करणार विरोध

कमी लसीकरण झालेल्या केंद्रांतील परिस्थितीचा १५ दिवसांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.पालिकेच्या माध्यमातून सोसायट्या, झोपडपट्ट्या, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी ‘व्हॅक्सिनेशन मोबाईल व्हॅन’ आणि कॅम्पच्या माध्यमातून लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. शिवाय गणेशोत्सव आणि गोविंदा मंडळांच्या माध्यमातून कॅम्प आयोजित करण्याचे नियोजित आहे. त्या ठिकाणी डोस आणि आवश्यक यंत्रणा पालिकेच्या माध्यमातून पुरवली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई अव्वल

मुंबईत आतापर्यंत दोन कोटी तीन लाख सात हजार ५२३ डोस देण्यात आले आहेत. देशात लसीकरणामध्ये मुंबईचा क्रमांक पहिला आहे.

Web Title: Bmc Thinking About Closing One Hundred And Twenty Five Corona Centers As Ninety Nine Percent Vaccination Done

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top