लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्या ५० ते ६० हजार जणांना BMC शोधणार

BMC त्यासाठी काय करणार?
Vaccination
Vaccinationesakal

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (second corona wave) प्रकोप पाहिल्यानंतर, संपूर्ण देशभरात लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालीय. नागरिकच लसीकरणासाठी स्वत:हून पुढे येत आहेत. आता लसींची उपलब्धतही (vaccine) वाढली असून लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा दिसतात. पण मुंबईत (Mumbai vaccination) अजूनही असे काही जण आहेत, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गांभीर्याने घेतलेलं नाही. (BMC to trace 50,000-60,000 people in Mumbai who skipped 2nd vaccine shot)

लसीचा एक डोस घेतल्यानंतर ते निर्धास्त झाले आहेत. मुंबईत ५० ते ६० हजार जण असे आहेत, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. पण दुसरा डोस घेण्यासाठी अजून ते फिरकलेले नाहीत. लसींच्या दोन डोसमध्ये जे अंतर आहे, तो कालावधी पूर्ण झाल्यानंतरही लसीकरणासाठी हे ५० ते ६० हजार जण आलेले नाहीत. दुसऱ्या डोससाठी जे पात्र आहेत, त्यांनी बीएमसीने वॉक-इनची सुविधा दिली आहे.

Vaccination
दूध आणायला गेल्याने रफी बचावले पण संपूर्ण कुटुंब संपलं

लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी महापालिकेने आता मोहिम सुरु केली आहे. मुंबईची ९३.५ लाख लोकसंख्या प्रौढ आहे. त्यात ३१ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. आठ टक्के म्हणजे ७.९ लाख लोकांची दोन्ही डोस घेतले आहेत. दुसरा डोस न घेणाऱ्यांना आता वॉर्ड ऑफिसमधून फोन करुन विचारणा केली जात आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या इतकी कमी का? ते शोधून काढणे महत्त्वाचे आहे, असे इम्युनायजेशन खात्याच्या प्रमुख डॉ. शीला जगताप यांनी सांगितले.

Vaccination
'भातखळकर जरा शांत घ्या', मॅनहोल्सवरुन महापौरांची शाब्दिक चकमक

"दुसरा डोस का घेतला नाहीय? त्यासाठी आम्ही सात कारणांची वर्गवारी केलीय. यात गर्भवती असणे, कोविडची लागण, लस घेण्याची इच्छा नसणे, एक-दोन दिवसात लस घेणार अशी कारणे यामध्ये आहेत" असे डॉ. शीला जगताप यांनी सांगितले. कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

लसींचा डोस चुकवणाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक आणि कोरोना योद्ध्यांचे प्रमाण जास्त आहे. १.९ लाख आरोग्य सेवक आणि २.३ लाख कोरोना योद्धयांनी पहिला डोस घेतला. पण त्यातल्या अनुक्रमे ६४ टक्के आणि ५५ टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य सेवकांसाठी १६ जानेवारीला तर कोरोना योद्ध्यांसाठी तीन फेब्रुवारीला लसीकरण सुरु झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com