एकीकडे मृतदेह बाजूलाच रुग्ण, सायन हॉस्पिटलमधील विदारक दृश्यानंतर महापालिकेने घेतली गंभीर दखल

एकीकडे मृतदेह बाजूलाच रुग्ण, सायन हॉस्पिटलमधील विदारक दृश्यानंतर महापालिकेने घेतली गंभीर दखल
Updated on

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारची गंभीर दखल पालिकेने घेतली असून कोरोनाच्या मृतदेहांसाठी वेगळी व्यवस्था शवागृहात करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच, कोरोनाचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी पुढे यावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

मुंबईच्या सायन रुग्णालयात कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्ये प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवलेल्या मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हडिओ आमदार नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे उघडकीस आणला आहे. यावर संतप्त प्रक्रिया उमटू लागल्या आहेत. कोरोनाचे मृतदेह तासंतास वॉर्डमध्ये पडून राहिल्याने कोरोनाचा प्रसार होणार असून डॉक्टर, नर्स, रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमात बातम्या आल्यावर त्याची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. 

नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा-

कोरोनाच्या रुग्णाचा मृतदेह असल्याने तो ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक पुढे येत नाहीत. प्रत्येक जाती धर्माचे वेगळे धार्मिक विधी असल्याने या मृतदेहांवर अत्यंसंस्कार पालिका करू शकत नाही. नातेवाईकांना अंत्यसंस्कार करायचे नसल्यास त्यांनी पालिकेला तसे कळवल्यास पालिका अंत्यसंस्कार करू शकते. कोरोनाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये बंद केलेला असतो. तसेच, मृतदेह ताब्यात घेणाऱ्यांना पीपीई किट दिले जाते यामुळे नातेवाईकांनी भीती न बाळगता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. शवागृहात 14 ते 15 मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. ती क्षमता पूर्ण झाल्यावर मृतदेह शवागृहात ठेवता येऊ शकत नाहीत. मात्र, पालिका आयुक्तांनी कोरोनाचे मृतदेह शवागृहात वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे आता असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रयत्न करू असे महापौरांनी म्हटले आहे.

BMC took serious action after horrible indecent recorded in sion hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com