शहरातील तब्बल ५०० झाडं तोडण्यास मुंबई महापालिकेची परवानगी

शहरातील तब्बल ५०० झाडं तोडण्यास मुंबई महापालिकेची परवानगी

मुंबईः मुंबई महापालिका शहरातील तब्बल ५०० झाडं तोडणार असल्याची माहिती मिळतेय. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं (Tree Authority (TA)) जवळपास ५०० झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसंच विविध प्रकल्पांसाठी संपूर्ण शहरात ३५६ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बुधवारी  ५ ऑगस्टला झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत जेव्हा शहरात जवळपास ३००  मिलिमीटर पाऊस पडला. 

जोगेश्वरी ते राममंदिर स्टेशनचा पूल बांधण्यासाठी आणि कांजूरमार्ग येथे अग्निशमन केंद्र बांधणं या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. तर टीएचे प्रमुख नगरपालिका प्रमुख असतात. त्याचे बहुतेक सदस्य शिवसेनेचे नगरसेवक आहेत. यात शिवसेनेचे सहा, भाजपचे सहा, कॉंग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचे एक सदस्य आहेत. यात चार तज्ज्ञ प्राधिकरणामध्ये सेवा देत आहेत. 

काँग्रेसचे नगरसेवक जगदीश कुट्टी म्हणाले की, नवीन प्रस्ताव घाईगडबडीने मंजूर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये बर्‍याच समस्या होत्या त्यामुळे आम्हाला काहीही कळले नाही. मात्र यावेळी शिवसेना नगरसेवक पूर्ण ताकदीने हजर होते. या ऑनलाईन बैठकीला निरर्थक घोषित केले पाहिजे, असं कुट्टी म्हणाले.  या बैठकीची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. त्यांनी कोणत्याही मतदानास परवानगी देखील दिली नाही, मात्र आमचा विरोध असूनही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

कोणत्याही साइटला भेट न देता तीन प्रस्ताव ठेवण्यात आले आणि आम्ही त्यांना परत ते प्रस्ताव परत घेण्यास सांगितलं. सभासद काय बोलत आहेत हे कोणालाही समजू शकले नाही. नियमांनुसार महापालिका आयुक्तांनी औपचारिकरित्या बैठकीचा समारोप न केल्यानं या बैठकीतून काहीचं निष्पन्न झालं नाही. म्हणून बैठक अद्याप सुरु आहे आणि साइटला भेटी दिल्याशिवाय आम्ही या झाडांना हात लावू देणार नाही, असं भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी म्हटलं आहे.

टीएचे सदस्य असलेले शिवसेना नेते यशवंत जाधव म्हणाले की, सर्व प्रस्तावांसाठी साइटला भेटी देण्यात आल्यात. एकूण १५ प्रस्ताव होते. २,७५९ झाडे तोडण्यासाठी प्रस्तावित होतं. त्यापैकी केवळ ४९५ तोडण्यास आम्ही परवानगी देण्यात आली आहे. आम्ही 20 टक्क्यांपेक्षा कमी झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. हे विकास आणि गृहनिर्माण प्रकल्पांसाठी होते जे बर्‍याच दिवसांपासून प्रलंबित होते आणि ते प्रस्ताव मंजूर करावे लागले.

BMC Tree Authority approved cut nearly 500 trees

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com