BMC : तरुणांचा लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

18 ते 44 वयोगटातील 92 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

मुंबई : मुंबईत 16 जानेवारी 2021 पासून कोविड विरोधातील लसीकरण मोहीम (vaccination drive) सुरु करण्यात आली. मुंबई महापालिकेने (bmc) प्रत्येक वयोगटानुसार आणि प्राधान्यानुसार लसीकरण मोहीम मुंबईत (mumbai vaccination) राबवली आहे. ज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचाही समावेश आहे. पण, या वयोगटासाठीची लसीकरण मोहीम 1 मे पासून सुरु झाली असली तरी या वयोगटातील नागरिकांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद (People great response) मिळाला असून या वयोगटातील तब्बल 92 टक्के नागरिकांचा पहिला डोस (first vaccination dose) पूर्ण झाला आहे.

Corona Vaccination
पनवेल : बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाईचा पोलिसांचा दिखावा

मुंबईत एकूण 56 लाख 84 हजार 800 एवढे नागरिकांचा 18 ते 44 वयोगटात समावेश आहे. त्यापैकी पहिला डोस  52 लाख 52 हजार 973 नागरिकांना पहिला आणि 26 लाख 25 हजार 256 नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. म्हणजेच 3 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत या वयोगटातील 92 टक्के नागरिकांना पहिला डोस आणि 46 टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद असून इतर या वयोगटातील नागरिकांचे ही 90 टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 99 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. आता साधारणपणे 70 ते 80 हजार नागरिक लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी शिल्लक आहेत. तर, जवळपास 66 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, पहिला डोस पूर्ण होण्यास नोव्हेंबर महिन्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे तर, जानेवारी अखेरपर्यंत मुंबईतील लसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेचे ध्येय असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Corona Vaccination
नवी मुंबई : उलवेतील तरुणाला सव्वा तीन लाखांचा गंडा

मुंबईतील 92 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करायचे होते. त्यापैकी कोविन पोर्टलनुसार 91 लाख 68 हजार 193 नागरिकांनी पहिला आणि 57,21,002 दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच 92 लाख लोकसंख्येपैकी आता जवळपास 70 हजार नागरिक पहिल्या डोस साठी बाकी आहेत पण, दसऱ्या पासून लसीकरणाची बसवलेली घडी विस्कटली असून सध्या धीम्या गतीने लसीकरण सुरु असल्याची खंत पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. शिवाय, दिवाळीच्या चार दिवसांत ही लसीकरण बंद राहिल्याचा परिणामही लसीकरण मोहिमेवर झालेला पाहायला मिळत असल्याचे अधिकारी सांगतात.

सोमवारी 1 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

दरम्यान, चार दिवसांच्या दिवाळी ब्रेकनंतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर प्रचंड प्रमाणात गर्दी केली असून सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 1,00,209 नागरिकांच्या लसीकरणाची नोंद कोविन पोर्टलवर करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com