पनवेल : बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाईचा पोलिसांचा दिखावा

काहीच दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आलेले हुक्क्का पार्लर मध्यरात्रीपर्यंत सुरु असल्याचे उघड
 hookah parlor
hookah parlorsakal media

पनवेल : तरुणाईला अमलीपदार्थांचे व्यसन (drug addcition) लावण्यासाठी पूरक वातावरण असणारे हुक्का पार्लर (hukka parlor) बंद शटरच्या आडून मध्यरात्री (midnight entertainment) उशिरापर्यंत सुरु ठेवले जात असून देखील नियमांचे उल्लंघन करून सुरु असलेल्या या हुक्का पार्लरवर (hookah parlor) थातुरमातुर कारवाई करण्याचा दिखावा कामोठे पोलीस (kamothe police) ठाण्याकडून केला जात असल्याने हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे फावले आहे.

 hookah parlor
कोरोनानंतर मुंबई महापालिका रुग्णालये होणार आणखी सुसज्ज

सद्य स्थितीत देशात अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे मध्यन्तरी घडलेल्या घटनांमधून पाहायला मिळत आहे सुपरस्टार शारुख खान याच्या मुलाची नुकतीच अशा एका प्रकरणातून जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.अमली पदार्थ सेवन करण्याकरिता पोषक असे वातावरण उपलब्ध असलेल्या हुक्का पार्लरमधून अनेकदा तरुणाईकडून पाहिल्यांदा अमलीपदार्थ सेवन करण्यात आल्याची अनेक उदाहरणे असल्याने मध्यंतरी राज्य सरकारने एका विशेष विधेयकाद्वारे हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचे विधेयक पारित केल्यानंतर काही काळ बंद असलेले हुक्का पार्लर न्यायालयाने दिलेल्या आयुर्वेदिक हुक्का पार्लर चालवण्याच्या परवानगी नंतर पुन्हा सुरु करण्यात आले असून न्यायालयाच्या निर्णयाकडे उंगलीनिर्देश करून आयुर्वेदिक हुक्का पार्लरच्या नावावर पुन्हा जुने प्रकार रात्री उशिरा पर्यंत सुरु ठेवण्याचे काम हुक्का पार्लर चालक करत आहेत.

दैनिक सकाळने मागील महिन्यात कामोठे वसाहतीत चालवण्यात येणाऱ्या हुक्का पार्लर विरोधात छापलेल्या वृत्त नंतर जग आलेल्या स्थानिक पोलिसांनी हुक्का पार्लर विरोधात कार वाई करत काही हजार रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले होते.पोलिसांच्या कारवाई नंतर काही दिवस नियमित वेळेत बंद केले जाणारे हुक्का पार्लर पुन्हा मध्यरात्री पर्यंत सुरु राहत असल्याने स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आहेत. करोना संसर्ग काळात संसर्ग होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांकडून पूर्वी करण्यात येणारे मद्यपींची मशिनद्वारे करण्यात येणारी चाचणी बंद करण्यात आली आहे मात्र त्याच वेळी हुक्का पार्लर हुक्का पिणार यांकडून एकाच नळीचा वापर केला जात असल्याचे पाहायला मिळते.

"कोणत्याही प्रकारे हुक्का पार्लर पनवेल हद्दीत सुरू असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल."
- शिवराज पाटील, डी.सी.पी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com