सोनू सूद अडचणीत, सहा मजली निवासी इमारतीला हॉटेलमध्ये रूपांतरित करण्याचा BMC चा आरोप; पोलिसात तक्रार दाखल

सुमित बागुल
Thursday, 7 January 2021

लॉकडाऊन दरम्यान गरिबांना मदत करणारा सोनू सूद आता विवादात अडकताना पाहायला मिळतोय.

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान गरिबांना मदत करणारा सोनू सूद आता विवादात अडकताना पाहायला मिळतोय. मुंबई महानगर पालिकेने सहा मजली निवासी इमारतीला हॉटेलमध्ये रूपांतरित केल्याच्या आरोपात सोनू सूद विरोधात जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

BMC कडून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, मुंबईतील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डिंग मुंबई महापालिकेला न माहिती देता हॉटेलमध्ये रूपांतरित केली. शक्ती सागर ही एक निवासी इमारत असून त्याचा कमर्शियल वापर करता येऊ शकत नाही अशी महापालिकेची भूमिका आहे. महाराष्ट्र रिजन अँड टाऊन प्लॅनिंग ऍक्ट कलम ७ अंतर्गत हा दंडनीय गुन्हा असल्याचंही BMC चं म्हणणं आहे. इमारतीच्या मुळ आराखड्यात बदल करणे, इमारतीचा काही भाग वाढवणे आणि त्याचा वापर करण्याचे आरोप सोनू सुदवर केले आहेत. 

महत्त्वाची बातमी : "जुन्या नाण्यांमध्ये पैसे गुंतवा आणि मोठा पैसा कमवा"; तुम्हालाही असं काही समजलं आहे का ?

यासोबतच BMC ने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, सोनू सूदने आपल्या बदललेल्या प्लॅनबाबत महापालिकेला माहिती दिलेली नाही. BMC कडून पाठवण्यात आलेल्या नोटिशींकडे देखील कानाडोळा केल्याचा आरोप BMC कडून केला गेलाय. महत्त्वाची बाब म्हणजे नोटीस पाठवल्यानंतरही सोनू ने अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले असल्याचं BMC ने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

BMC च्या नोटिशीविरोधात सोनू सूद कोर्टात 

BMC कडून पाठवण्यात आलेल्या नोटिसीविरोधात सोनू सूद याने कोर्टात धाव घेतली होती. मात्र सोनूला कोर्टाकडून कोणताही अंतरिम दिलासा मिळला नाही. त्यानंतर कोर्टाकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी तीन आठवंड्यांची मुदत देण्यात आलेली. आता ही तीन आठवड्यांची मुदत देखील संपुष्टात आली आहे. मात्र सोनुने त्यानंतरही अनधिकृत बांधलं हटवले नाही आणि  निवासी इमारतीला रूपांतरित करण्याची प्रक्रिया देखील थांबवलीही नाही. 

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांचं आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचं प्रेम पडलंय धूळ खात, आठ कोटींचा होतोय चुराडा

याबाबत सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली आहे. BMC  कडून जमिनीच्या मालकी हक्काच्या हस्तांतरणाची परवानगी घेतली आहे. दरम्यान आता महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथॉरिटीकडून परवानगी मिळणे बाकी आहे. BMC  कडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडांनही सोनू ने केलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांकडून तपास करण्यात येईल. यामध्ये सोनू दोषी आढळला तर त्याविरोधात FIR दाखल केली जाऊ शकते. 

मुंबई परिसरातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

BMC Vs Sonu Sood complaint registered against sonu for illegal construction im shakti sagar building


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Vs Sonu Sood complaint registered against sonu for illegal construction im shakti sagar building