"जुन्या नाण्यांमध्ये पैसे गुंतवा आणि मोठा पैसा कमवा"; तुम्हालाही असं काही समजलं आहे का ?

"जुन्या नाण्यांमध्ये पैसे गुंतवा आणि मोठा पैसा कमवा"; तुम्हालाही असं काही समजलं आहे का ?

मुंबई मुंबईतील खार पोलिसांनी लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका ठगाला ताब्यात घेतलं आहे. दुर्मिळ नाण्यांमध्ये पैसे गुंतवा आणि जास्त परतावा मिळवा या बहाण्याने हे दोघे नागरिकांना फसवत होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तीस वर्षीय व्यक्तीस अटक  केली आहे. त्यासोबत एका ब्रिटिश नागरिक देखील पोलिसांच्या रडारवर आहे.  मुंबई पोलिसांनी कारवाई करत आमिर याकूब शेख या तीस वर्षीय इसमाला मुंबईतील खार भागातून ताब्यात घेतलं आहे. तर याच स्कॅममधील 'इसा अहमद खान' नामक ब्रिटिश नागरिक सध्या फरार आहे. 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर याकूब शेख हा अहमद खानला मुंबईतील भेंडी बाजार भागातून जुनी नाणी मिळवण्यास मदत करायचा. शेख याने मुंबईत इलिना मार्केटिंग नामक एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्याने लोकांकडून तब्बल दोन कोटी रुपये गोळा केले होते. त्यांनी लोकांना जुन्या नाण्यांमधून जास्त परतावा मिळतो सांगत त्यांच्याकडून जमा केले होते. तर खान याने मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात 'इ ए रारकोआ कलेक्टिबल्स प्रायव्हेट लिमिटेड' नावानी एक फार्म सुरु केली होती. याची एक शाखा बंगळुरूमध्ये देखील आहे.  

सुरवातीला या ठगांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिलेत. मात्र, त्यानांतर त्यांनी गुंतवणूकदारांना नफा देणे बंद केले. यासंदर्भात गुंतवणूक केलेल्या एका इसमाने ७० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी याबाबत खान यांच्या कंपनीविरोधात तक्रार नोंदवलेली आहे.  

यवबाबत तपास करत असताना मुंबई पोलिसांनी विविध देशांमधील ९१७ दुर्मिळ नाणी जप्त केली आहेत. सोबतच पोलिसांनी आरोपींच्या नावावर सहा बँक खाती असल्याचंही शोधून काढलंय. त्यांच्या खात्यामध्ये एक कोटीपेक्षा अधिकची रक्कम आहे. 

या दोघांवर IPC कलम ४२० अंतर्गत फसवणूक तसेच संबंधित सर्व कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

invest in rare coins and get massive returns man held for duping people

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com