Mumbai News: चुनाभट्टी यंदा पूरमुक्त? नव्या जलवाहिनीसह मिनी पंपिंग स्टेशन उभारणार, काम कधी पूर्ण होणार?

BMC Water Conveyance Department : पावसाळ्यात लोकल वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी पालिका चुनाभट्टी येथे नव्या जलवाहिनीसह मिनी पंपिंग स्टेशन उभारणार आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

​मुंबई : पावसाळ्यात दरवर्षी जलमय होणाऱ्या आणि मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला अडथळा ठरणारा चुनाभट्टी परिसर पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानंतर या परिसरात मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. येत्या १५ मेपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com