नदी शुध्दीकरण प्रकल्पासाठी कंत्राटदारांना BMC ची शेवटची संधी; 29 डिसेंबर नंतर मुदतवाढ बंद

नदी शुध्दीकरण प्रकल्पासाठी कंत्राटदारांना BMC ची शेवटची संधी; 29 डिसेंबर नंतर मुदतवाढ बंद


मुंबई : नदी शुध्दीकरण प्रकल्पासाठी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महानगर पालिकेने आता शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 29 डिसेंबर नंतर या निविदांना मुदतवाढ देण्यात येणार नसून तो पर्यंत प्रतिसाद दिलेल्या कंपन्यांमधून या कामासाठी निवड केली जाणार आहे.

मुंबईतील दहिसर,पोयसर,ओशिवरा या नद्यांमध्ये येणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुध्द पाणी नदीत सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीचा प्रवास पुन्हा शुध्द होणार आहे.यासाठी महानगर पालिका मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे,नदीत येणार मैलापाण्याचा प्रवाह रोखून तो प्रक्रिया केंद्रात आणणे यासाठी महानगर पालिका मे महिन्या पासून निवीदा मागवत आहे.मात्र,वेळोवेळी मोठ मोठ्या कंपन्यांनीयासाठी मुदतवाढ मागवली होती.आता तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.29 डिसेंबर रोजी निवीदा भरण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.यापुढे   निवीदा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही असे अतिरीक्त आयुक्त पी.वेलारसु यांनी सांगितले.
पोयसर नदीच्या शुध्दीकरणासाठी 751 कोटी आणि ओशिवरा नदीच्या शुध्दीकरणासाठी 503 कोटी रुपये अंदाजित खर्च आहे.त्याच बरोबर दहिसर नदीच्या शुध्दीकरणासाठी दोन ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे.

मिठीच्या पहिल्या टप्प्याला मंजूरी
मिठी नदी शुध्दी करणाच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली आहे.यात,नदीच्या उगमापासून दोन किलोमिटरच्या परीसरात हे काम करण्यात येत आहे.यात,नदीत येणाऱ्या सांडपाण्याचा प्रवाह रोखण्यात येणार आहे.त्याच बरोबर स्थायी समितीने नोव्हेंबर महिन्यातच मिठी नदीच्या बाजूने येणारे सांडपाणी रोखणे,काही भागात खोलीकरण करुन संरक्षक भिंत बांधणे तसेच इतर कामांना परवानगी दिली आहे.यासाठी 500 कोटीहून अधिक खर्च होणार आहे.तसेच,शेवटच्या टप्प्यात मिठी नदीच्या पात्रात जाणारे सांडपाणी धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.   त्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत.समुद्राच्या भरतीचे पाणी रोखण्यासाठी धरणा प्रमाणे दरवाजे बसविण्यात येणार आहेत.

BMCs last chance to contractors for river purification project Extension closed after 29 December

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com