BMCचे वराती मागून घोडे! "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती

BMCचे वराती मागून घोडे!  "अग्निशमन'च्या उपकेंद्रानंतर निवासस्थान व कार्यालयाची दुरुस्ती

मुंबई : बोरीवली येथील मुंबई अग्निशमन दलाचे कमांड सेंटर (उपकेंद्र) सुरू होऊन एक वर्ष झाल्यानंतर महापालिका आता येथील कार्यालय आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरुस्ती करणार आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात हे कमांड सेंटर सुरु करण्यात आले होते. 

भायखळा येथील मुख्य केंद्रासह मुंबई अग्निशमन दलाने उपनगरात उपकेंद्र उभारण्यास सुरवात केली आहे.यात,मुख्यालयातील यंत्रणे प्रमाणेच यंत्रणा बंब,शिड्या तसेच इतर उपकरणे तैनात ठेवण्यात येतात.बोरीवली येथे असे उपकेंद्र गेल्या वर्षी तयार झाले.त्याचा वापर जुलै 2019 पासून सुरुही झाला.पण,ही यंत्रणा हाताळणारे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने कार्यालये जुनी असल्याची आठवण अग्निशमन दलाला वर्षानंतर झाली आहे. 

संकुलातील कार्यालयाची इमारत,अधिकारी वसाहत,कर्मचारी वसाहत पंप रुम,इजिन बे,डिझेल रुम,ड्रील टॉवर यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.त्यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये महापालिका खर्च करणार आहे.तसा प्रस्ताव स्थापत्य समिती उपनगरेच्या पटलावर मांडला आहे. 

26 टक्के कमी दराने काम 
महापालिकेत सध्या कमी खर्चात होणारी उद्यान दुरुस्ती गाजत आहे.कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजा पेक्षा 30 टक्के कमी दरात कामे करण्याची तयारी दाखवल्या मुळे स्थायी समितीने या कामाच्या दर्जावर प्रश्‍न निर्माण केला आहे.त्यानंतर आता उपकेंद्राच्या दुरुस्तीतही 26 टक्के कमी दराने करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे.पालिकेने या कामासाठी 2 कोटी 42 लाख 31 हजार 795 रुपयांचे अंदाज पत्रक तयार केले होते.मात्र,आर.एस.एंटरप्राईझेस या कंत्राटदाराने हे काम 1 कोटी 81 लाख 44 हजार 365 रुपयात करण्याची तयारी दाखवली आहे.करांसह पालिकेने 1 कोटी 88 लाखांचा प्रस्ताव सादर केला आहे.  

 Horses behind BMCs show Repair of residence and office after fire sub station
-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com