आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही पण... ! देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

तुषार सोनवणे
Saturday, 28 November 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामावर चौफेर टीका केली.

मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपवच्या वतीने सरकाच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामावर चौफेर टीका केली.  परंतु यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी अशी आमची इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - नरेंद्र मोदी पुण्यात येणार, मात्र राज्यपाल किंवा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाही

पत्रकारी परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, '' एका वर्षात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. कुठल्याही घटकाचं ते समाधान करु शकलेलं नाही. सरकारच्या तीन पक्षात कुठलाही समन्वय नाही. वीजेच्या पश्नावर त्यांनी घुमजावं केलं. ज्या प्रकारे बदल्यांचे दलाल आज फिरत आहेत आणि जी अवस्था आपल्याला पहायला मिळतेय ती तर पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही नव्हती. बदल्यांव्यतिरिक्त तर कुठलाच कारभार या सरकारमध्ये होताना दिसत नाही''.

हेही वाचा - ED आणि CBI वर निशाणा साधणारं संजय राऊतांचं ठाकरी पद्धतीचं विशेष व्यंगात्मक ट्विट

''एक वर्षाच्या निमित्ताने अपयशी ठरलेल्या या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना मी एवढचं सांगेन की तुम्ही मुख्यमंत्र्यांसारखे वागा. संयम हा तुमच्या बोलण्यात आणि कृतीत दोन्ही ठिकाणी दिसला पाहिजे. आमची राष्ट्रपती राजवटीची मागणी बिल्कुल नाही, पण संविधानिक प्रक्रिया मोडल्याचं आणि सत्तेचा दुरुपयोग या  दोन निर्णयांशिवाय सरकारच्या चुकीच्या कारभाराचं वेगळं उदाहरण काय हवं आहे,”  अशी कडक भाषेत टीकाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

We do not demand imposition of Presidents rule but Devendra Fadnavis criticizes the Chief Minister

---------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We do not demand imposition of Presidents rule but Devendra Fadnavis criticizes the Chief Minister