‘रिलायन्स कॅपिटल’चे संचालक मंडळ बरखास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance

‘रिलायन्स कॅपिटल’चे संचालक मंडळ बरखास्त

मुंबई : थकीत देणी तसेच व्यवस्थापनाबाबतच्या चिंतांमुळे रिझर्व्ह बँकेने आज रिलायन्स कॅपिटल या अनिल अंबानींच्या वित्तसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले. अनेक देणी थकविल्याच्या प्रमुख मुद्यावरून ही कारवाई झाली आहे.

कंपनीवर लवकरच दिवाळखोरीसंदर्भातही कारवाई केली जाईल. रिझर्व्ह बँकेने कंपनीवर तूर्त प्रशासक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र चे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे.

लवकरच इन्सॉलव्हन्सी अँड बँकरप्सी रूल्स नुसार कंपनीवर कारवाई करण्याचेही सूतोवाच रिझर्व्ह बँकेने केले आहे. देणी थकविण्याबरोबरच कंपनीच्या व्यवस्थापनासंदर्भातील काही मुद्द्यांची सोडवणूक संचालक मंडळ करू शकले नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तान : तालिबान शासनाला १०० दिवस पूर्ण

दिवाळखोरीच्या कारवाईसंदर्भात प्रशासक नेमण्यासाठी लवकरच रिझर्व्ह बँक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडेही अर्ज करणार आहे. न्यायालयाने कंपनीच्या मालमत्तांची विक्री करण्यास मनाई केल्याने आपल्याला पैसे जमवणे कठीण झाले व त्यामुळे कर्जे थकली, असे कंपनीने मागीलवर्षी शेअर बाजारांना कळवले आहे.

एचडीएफसी व अॅक्सिस बँक यांच्याकडून घेतलेल्या कर्जावरील ६२४ कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज थकविल्याचे रिलायन्स कॅपिटलने कळवले होते. एचडीएफसी चे थकलेले व्याज चार कोटी ७७ लाख तर अॅक्सिस बँकेचे व्याज ७१ लाख रु. होते. सव्वाआठ ते साडेदहा टक्के व्याजदराची ही कर्जे होती व त्यांची मुदत सहा महिने ते सात वर्षे एवढी होती

Web Title: Board Of Directors Of Reliance Capital Dismissed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CapitalReliance Company