VIDEO - तब्ब्ल ८८ प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट मांडवा जेट्टीजवळ बुडाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई - बातमी अलिबाग मधून. अलिबागमधील मांडवा जेट्टीजवळील एका खडकाला जोरदार टक्कर झाल्याने एक प्रवासी बोट उलटल्याची भीषण घटना आज सकाळी घडलीये. ही बोट मुंबईहून अलिबागला प्रवाशांना घेऊन जात होती. या बोटीवर तब्ब्ल ८८ प्रवासी होते. सुदैवाची बाबा म्हणजे या बोटीवरील सर्व ८८ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात आलंय. सदर घटना आज सकाळी साडे दहा वाजता घडलीये.  

मुंबई - बातमी अलिबाग मधून. अलिबागमधील मांडवा जेट्टीजवळील एका खडकाला जोरदार टक्कर झाल्याने एक प्रवासी बोट उलटल्याची भीषण घटना आज सकाळी घडलीये. ही बोट मुंबईहून अलिबागला प्रवाशांना घेऊन जात होती. या बोटीवर तब्ब्ल ८८ प्रवासी होते. सुदैवाची बाबा म्हणजे या बोटीवरील सर्व ८८ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात आलंय. सदर घटना आज सकाळी साडे दहा वाजता घडलीये.  

मोठी बातमी - तुमचा दररोजचा ऑक्सिजन म्हणजेच मोबाईल डेटा 'इतक्या' पटीने महागणार... 

ही बोट मुंबईहून अलिबागला प्रवाशांना घेऊन जात होती. मांडवा जेट्टीपासून साधारण १ किलोमीटर अंतरावर असताना ही बोट समुद्रातील एका मोठ्या खडकाळ आदळली. खडकाला आदळताच या बोटीत पाणी भरण्यास सुरवात झाली. बोटीत पाणी भरल्याने ही बोट क्षणार्धात समुद्रात बुडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सदर अपघात झाला त्यावेळी पोलिसांची एक गस्तीबोट या भागात जवळच होती. पोलिसांच्या बोटीला सर्व प्रकार लक्षात येताच चपळाईने मदतकार्य राबवण्यात आलं आणि तात्काळ बोटीवरील सर्वांना वाचवण्यात आलं.  या बोटीवर तब्ब्ल ८८ लोकं होती. 

मोठी बातमी - गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण, वाचा रिपोर्ट

अजंठा कंपनीची ही लाकडी बोट होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अंजठा बोटीतील प्रवाशी हादरुन गेले. सुदैवाने त्यावेळी पोलिसांची पेट्रोलिंग बोट तिथे असल्याने बोटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तीन ते चार कंपन्या गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक करतात. इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते.

 

यामुळे बोट बुडाली

मांडवा बंदराजवळ ही बोट येत असताना एका खडकाळ आदळल्याने अचानक बोटीत बिघाड झाला आणि पाणी घुसू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन, प्रवाशांनी थेट आरडाओरड सुरू केली. मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी सद्गुरू कृपा बोटीसोबत पोलिस नाईक प्रशांत घरत यास तातडीने पाठवून दिले. अजंठा या बोटसेवा देणाऱ्या कंपनीवर पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मराज सोनके यांनी सांगितले.

a boat with 88 travelers drown near alibag mandwa everyone is safe 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a boat with 88 travelers drown near alibag mandwa everyone is safe