esakal | गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण, वाचा रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण, वाचा रिपोर्ट

गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजारांना आमंत्रण, वाचा रिपोर्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या धसक्‍यामुळे गरज नसतानाही तोंडाला मास्क लावून फिरणे आजारांना आमंत्रण ठरू शकतात.मास्क वापरण्या बरोबरच ते हाताळण्याचीही पध्दत आहे. ते जर योग्य पध्दतीने न हातळल्यास हवेतील फ्ल्यू जन्य आजार होऊ शकतात. 

"मास्कच्या बाहेरील भागावर विषाणू जमा झालेले असतात. त्या बाहेरील भागाला हात लागल्यावर तो हात डोळे, नाकाच्या संपर्कात आल्यास विषाणूचा फैलाव होऊ शकतो. असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मास्क वापरण्याचे आणि हाताळण्याची पध्दत असते. या पध्दतीचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी सांगितले नसेल तर मास्क वापरू नका असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.यशश्री केणी यांनी सांगितले.

मोठी बातमी - "दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य

मुंबईच्यां हवेत स्वाईन फ्ल्य, सामान्य फ्ल्यू याचे विषाणू असतात. त्यामुळे हे विषाणू मास्कच्या पुढील भागावर अडकलेले असल्याची शक्‍यता असू शकते. दैनंदिन जिवनात मास्कला वारंवार हात लावला जातो. त्यातून विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्याच बरोबर हे मास्क उघड्यावर टाकल्यास त्याला कोणाचा हात लागल्यास त्यालाही या विषाणूची बाधा होऊ शकते. अशी शक्‍यताही वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या भितीमुळे मुंबईत मास्कचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे डॉक्‍टरच्या चिठ्ठी शिवाय मास्क देऊ नये असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, तरीही काळ्या बाजारात मास्कची विक्री सुरु आहे. 

मोठी बातमी - "माझ्या घोषणांमुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण" - रामदास आवठवले

उष्णतेमुळे विषाणू कमी होणार नाही 

वाढत्या तापमानामुळे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कमी होऊ शकतो अशी चर्चा सुरु आहे. मात्र, महापालिकेने ही शक्‍यता फेटाळली आहे. "गरम वातावरणातही हा विषाणू जगू शकतो असे डॉ.केणी यांनी सांगितले. 
 
असा होतोय प्रसार 

कोरोना बाधित रुग्णांच्या शिंकेतून खोकल्यातून या विषाणूचा प्रसार होत असल्याची शक्‍यता आहे. शिंक, खोकल्यातून उडणारे धुंकीचे कण हे एक मिटर पर्यंत उडू शकतात. त्या टप्यात एखादी असेल तर त्यावर हे विषाणू जाऊ शकतात. तसेच, ज्या पृष्टभागावर हे विषाणू पडतील त्या पृष्टभागाला दुसऱ्या व्यक्तीचा हात लागला तर त्याला हे विषाणू चिकटू शकतात. 

improper and unnecessary use of maks is very unhygienic and invitation to various disease

loading image
go to top