
Mumbai: चार दिवसांपूर्वी गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या फेरी बोटीला झालेल्या अपघातात १५ जणांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच रेवस-करंजादरम्यानही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून ‘मृत्यूची बोट फेरी’ चालवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तसेच गेटवे ऑफ इंडिया येथे रात्रीच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ सुरू असलेला बोटवल्यांचा हा मनमानी कारभार कोणाच्या अशीर्वादाने सुरू आहे, सागरी महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला याचा थांगपत्ता नाही का, असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.