
नवी मुंबई : सन..आयलाय..गो..आयलाय..गो नारली पूनवंचा..मन आनंद माव ना..कोल्यांच्या दुनियेला...या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरायला अवघा रायगडासह ठाणे, मुंबई आणि पालघरमधील कोळीवाडे सजले आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवासापासून पारंपारीक मासेमारीला सुरुवात होते. समुद्राला नारळ वाहयल्यानंतर उधाण कमी होते, आणि मासेमारीला गेलेल्या होड्यांचे समुद्रदेवता रक्षण करते अशी कोळी समाजाची समज आहे. त्यामुळे हा सण अगदी अबालवृद्धांपासून सगळे घटक सहभागी होतात. पारंपारीक वेशभूषेत मनसोक्त गाणे गात व नृत्य करीत नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.