कौतुकास्पद! मुंबई पोलिसांच्या मदतीला सेलेब्रिटींच्या व्हॅनिटी व्हॅन

vanity van
vanity van

मुंबई ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. यावेळी पोलिसांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत असतानाच, छोटीशी मदत म्हणून बॉलिवूड कलाकारांसाठी असलेल्या 13 व्हॅनिटी वॅन उपलब्ध पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

व्हॅनिटी व्हॅनमध्ये 3 खोल्यांसह स्वच्छतागृह, झोपण्याची व्यवस्था असते.  जेवण करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी आणि शौचालयासाठी या पोलिसांना व्हॅनिटी व्हॅनचा वापर होत आहे. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच एसीचीही सोय या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहेत. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात महिला पोलीस कर्मचा-यांना व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या या व्हॅनिटी व्हॅन पश्चिम उपनगर, मध्य मुंबईत दाखल झाल्याने, पोलिस कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला. व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध झाल्याने आमच्या अनेक समस्या सुटल्या आहेत, आम्हाला याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया महिला पोलिसांनी दिली आहे.

केतन रावल यांनी 13 व्हॅनिटी व्हॅन पोलिसांसाठी खुल्या केल्या आहेत. केतन रावल यांच्याकडे स्वतःच्या 45 व्हॅनिटी व्हॅन आहेत. देशभरातील सेलिब्रिटींसाठी ते व्हॅनिटी व्हॅन पुरवितात. लॉकडाऊनमुळे त्यांचे रोज 80 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत नुकसान होत आहे; मात्र एकीकडे एवढे नुकसान होत असताना त्यांची चिंता न करता त्यांनी आपल्या खऱ्या हिरोंना अर्थात पोलिसांना मदत करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात आतापर्यंत 13  व्हॅनिटी वॅन उपलब्ध केल्या आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com