खुशखबर ! बांधकाम कामगारांच्या थेट खात्यात येणार 'इतके' पैसे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

सरकारने दिले कामगार आयुक्तांना पैसे जमा करण्याचे आदेश 

मुंबई, ता. १८ : लॉकडाऊनच्या काळात काम बंद झाल्यामुळे ठिकठीकाणी अडकून पडलेल्या कामगारांसाठी खुशखबर आहे.आता अशा बांधकाम कामगारांना सरकारकडून दोन हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. इमारत आणि  इतर  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना ही मदत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने काढलेल्या आदेशानुसार बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये  थेट  ही  मदत  जमा  करण्याचा  आदेश  सरकारने  जारी केला आहे. 

सर्वात मोठी बातमी ; २० एप्रिल नंतर महाराष्ट्रात 'या' गोष्टी होणार सुरु...
 

मोठी बातमी - झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला असून त्यामुळेइमारत व इतर बांधकामाची कामे बंद झाली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेलेकामगार कामाविना चिंतेत जीवन जगत आहेत. त्यांना रोजंदारीचे काम नसल्यामुळे दैनंदिनगरजांची पुर्तता करणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन सरकारने या सर्व कामगारांच्या खात्यात दोन हजार इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश कामगार आयुक्तांना दिले आहेत. शनिवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आला असून इमारत आणि इतर  बांधकाम कामगार  कल्याणकारी  मंडळाच्या  नोंदणीकृत  कामगारांना  या आदेशामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

registered construction workers will get money from government

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: registered construction workers will get money from government